ताज्या घडामोडी

*नगरपरिषद निवडणूक : मतमोजणीची तयारी पूर्ण : नगराध्यक्षासाठी २३ तर नगरसेवकसाठी ३३९ उमेदवारांचा निकाल होणार स्पष्ट*

गडचिरोली, (जिमाका) दि. २० : जिल्ह्यातील गडचिरोली, देसाईगंज व आरमोरी या तीन नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ व २० डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले असून २१ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.
गडचिरोली नगरपरिषदेची मतमोजणी कृषी महाविद्यालय, सोनापूर येथे होणार असून येथे प्रत्यक्ष मतमोजणीसाठी ७ व पोस्टल बॅलेटसाठी १ असे एकूण ८ टेबल असतील. देसाईगंज नगरपरिषदेची मतमोजणी देसाईगंज नगरपरिषद सांस्कृतिक सभागृहात पार पडणार असून येथे प्रत्यक्ष मतमोजणीसाठी १० व पोस्टल बॅलेटसाठी १ असे एकूण ११ टेबल निश्चित करण्यात आले आहेत. आरमोरी नगरपरिषदेची मतमोजणी तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालय येथे होणार असून येथे प्रत्यक्ष मतमोजणीसाठी ३ व पोस्टल बॅलेटसाठी १ असे एकूण ४ टेबल ठेवण्यात आले आहेत.
या निवडणुकीत तीनही नगरपरिषदांमधून नगराध्यक्ष पदासाठी एकूण २३ तर नगरसेवक पदासाठी ३३९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. गडचिरोली नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी ७ तर नगरसेवक पदासाठी १३१ उमेदवार, देसाईगंज नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी ६ व नगरसेवक पदासाठी १०० उमेदवार, तर आरमोरी नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी १० व नगरसेवक पदासाठी १०८ उमेदवारांनी निवडणूक लढवली आहे.
मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक व सुरळीतपणे पार पडावी यासाठी सर्व तांत्रिक, प्रशासकीय व सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.मतमोजणीला सकाळी १० वाजेपासून सुरूवात होणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button