ताज्या घडामोडी

*डॉ. मिलिंद नरोटे आमदार यांच्या पुढाकारातून मार्कंडा येथे झाडीपट्टी नाटकांचे 3 दिवस निःशुल्क आयोजन*

*सांस्कृतिक कार्य विभागातर्फे तीन दिवसीय नाट्य महोत्सव*

मार्कंडा जि. गडचिरोली : सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य मुंबईतर्फे दिनांक 16. 17. 18 फेब्रुवारी 2026 रोज सोमवार मंगळवार व बुधवार ला सायंकाळी साडेसहा वाजता मुख्य प्रवेशद्वाराजवळ मार्कंडा जिल्हा गडचिरोली येथे झाडीपट्टी नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. झाडीपट्टी नाट्य रंगभूमीचा विकास व्हावा , या नाट्यरंगभूमीचे जतन व संवर्धन करून नवीन कलाकार तयार व्हावेत .या हेतूनेच सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड .आशिष शेलार यांचा संकल्पनेतून व अप्पर सचिव श्री कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनातून व संचालक श्री पांडे यांच्या नियोजनातून ह्या महोत्सवाच्या आयोजन करण्यात आलेले आहे. तरुण पिढीमध्ये झाडीपट्टी नाट्यकलेची आवड निर्माण व्हावी. नवोदित कलावंतांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास व्हावा. व योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच त्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा व त्यांना योग्य व्यासपीठ मिळावे ह्या एका उदात उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबईतर्फे झाडीपट्टी नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेली आहे. दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोज सोमवारला रक्षक या नाटकाचे सादरीकरण होणार आहे या नाटकाचे लेखक दिग्दर्शक परमानंद गहाणे हे आहेत. तर 17 फेब्रुवारी 2026 रोज मंगळवार ला अवतार या नाटकाचे सादरीकरण बघायला मिळणार आहे. यांचे लेखक महेश महेंद तर दिग्दर्शक शेरू खान, व सोमनाथ नागवंशी हे आहेत तर शेवटच्या म्हणजे तिसऱ्या दिवशी बापाचे काळीज या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. ह्याचे लेखक व दिग्दर्शक अशोक दुधकर व बाळकृष्ण ठाकूर हे आहेत. सदर नाटकाचे प्रवेश निशुल्क असून त्याच्या रसिकांनी व जनतेनी जास्तीत जास्त व मोठ्या संख्येने उपस्थित राहून आस्वाद व लाभ घ्यावा असे आवाहन संचालक सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button