*गडचिरोली वृतपत्र विक्रेता संघटने कडून “भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिवस” उत्साहात साजरा*

गडचिरोली- *आज १५ ऑक्टोबर आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती, थोर वैज्ञानिक ज्यांना संपुर्ण जग “भारतीय मिसाईल मॅन” म्हणून ओळखतो असे थोर व्यक्तिमत्व असलेले भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम साहेब यांचा जन्म दिवस तसेच वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून आजचा दिवस हा भारतातील वृतपत्र विक्रेते “भारतीय वृतपत्र विक्रेता दिवस” म्हणून सुद्धा साजरा करतात.*
*गडचिरोली वृतपत्र विक्रेता संघटने कडून सुद्धा गडचिरोली शहरात मोठ्या उत्साहात डॉ. कलाम साहेबांचा जन्मदिवस व वृतपत्र विक्रेता दिवस साजरा करण्यात आला. यावेळी गडचिरोली वृतपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष श्री. अनिल बाळेकरमकर यांनी दिप प्रज्वलन करून कलाम साहेबाच्या फोटोला माल्यार्पण केले. सचीव श्री. लोमेश बांबोळे यांनी सुत्रसंचालन केले तर संघटनेचे उपाध्यक्ष श्री. राजेन्द्र गव्हारे यांनी उपस्थितांना डॉ. कलाम साहेबांबद्दल थोडक्यात माहिती सांगितली व वृतपत्र विक्रेता दिवस 15 ऑक्टोबर साजरा करण्याबद्दल माहिती दिली.*
*आजच्या कार्यक्रमा निमित्त शहरात पेपर वाटप करणाऱ्या सर्व मुलांसाठी संघटनेकडून नाश्ता व चहाचे आयोजन करण्यात आले होते*
*आजच्या कार्यक्रमाला संघटनेचे कोषाध्यक्ष श्री. प्रशांत वाढई, सह सचिव श्री. मारोती बाळेकरमकर, कार्याध्यक्ष श्री. संजय आकरे, प्रसिद्धि प्रमुख श्री. संदीप आकरे, सह कोषाध्यक्ष श्री. देवेंद्र बारापात्रे, विक्की गव्हारे, पुरूषोत्तम रोळेे, आकाश वैरागडे, सचिन आकरे, रमेश गव्हारे, हिराचंद बोबाटे, रुपेश वाढई, प्रज्वल उंदिरवाडे आदी सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.*
