ताज्या घडामोडी

*शरणागती पत्करलेल्या माओवाद्यांना रोजगार दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केले लॉयड्स मेटल्सचे कौतुक*

● कंपनीच्या स्थानिक रोजगार उपक्रमांतर्गत आतापर्यंत ६८ आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचे कौशल्य प्रशिक्षण आणि नोकऱ्यांद्वारे करण्यात आले आहे पुनर्वसन

*कोनसरी, गडचिरोली – महाराष्ट्र, १५ ऑक्टोबर २०२५:*
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोलीमध्ये सामूहिक आत्मसमर्पण करीत साठ माओवाद्यांनी शस्त्रे टाकली आहेत. वरिष्ठ नेता सोनू उर्फ भूपती याच्या नेतृत्वाखालील सदर आत्मसमर्पणातुन या भागात सुरू असलेल्या संरचित पुनर्वसन प्रक्रियेवरील वाढता विश्वास दिसून येतो.
लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) ने महाराष्ट्र सरकार आणि गडचिरोली पोलिसांच्या समन्वयाने आतापर्यंत ह्यापूर्वी आत्मसमर्पण केलेल्या ६८ माओवाद्यांना, तसेच माओवादी हिंसाचाराने बाधित झालेल्या कुटुंबांच्या १४ सदस्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे, असे एकूण ८२ व्यक्ती प्रशासन, नागरी आणि बांधकाम कार्य, आणि यांत्रिक परिचालन यासारख्या विभागांमध्ये कार्यरत आहेत.
आत्मसमर्पण केलेल्या अनेक व्यक्तींचे औपचारिक शिक्षण मर्यादित होते हे ओळखून, एलएमईएल ने कौशल्य-आधारित पुनर्वसन मॉडेल लागू केले. सहभागींना कोनसरी येथील लॉईड्स कौशल्य विकास आणि प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देण्यात आले. कंपनीच्या कार्यबळात सामील होण्यापूर्वी संबंधित तांत्रिक कौशल्ये त्यांनी आत्मसात केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनीही एलएमईएल च्या उपक्रमाचे कौतुक केले. बुधवारी गडचिरोली येथील पोलिस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना श्री. फडणवीस म्हणाले, “आम्ही आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांचे पुनर्वसन केले आहे. लॉईड्स मेटल्सने यापूर्वी आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना नोकऱ्या दिल्या आहेत. लॉईड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रभाकरन यांनी मला आश्वासन दिले आहे की आत्मसमर्पित माओवाद्यांपैकी जे इच्छूक आहेत त्यांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.”
लॉईड्स मेटल्स एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखनिज खाणी चालवते. कोनसरी येथे डायरेक्ट रिड्यूस्ड आयर्न (DRI) आणि पेलेट प्लांट द्वारे कंपनीने आपला कार्यविस्तार केला आहे. २२ जुलै २०२५ रोजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी कोनसरी येथे एलएमईएलच्या प्रस्तावित एकात्मिक पोलाद प्रकल्पाचे भूमिपूजन केले आणि ८७ किलोमीटर लांबीच्या स्लरी पाइपलाइन आणि लोहखनिज ग्राइंडिंग युनिटचे उद्घाटन केले. या प्रकल्पांमुळे प्रादेशिक अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल आणि अतिरिक्त रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशी अपेक्षा आहे.
व्यवस्थापकीय संचालक श्री बी. प्रभाकरन यांच्या नेतृत्वाखाली एलएमईएलने स्थानिक रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासावर सातत्याने लक्ष केंद्रित केले आहे. एल टी गोंडवाना स्किल हब प्रायव्हेट लिमिटेड उपक्रमाद्वारे कंपनीने जुलै २०२५ च्या अखेरीस सुमारे १,४०० स्थानिक तरुणांना प्रशिक्षित केले. सध्या शेकडो तरुण विविध कौशल्यांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत.
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की उद्योग, सरकार आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील समन्वित प्रयत्नांमुळे गडचिरोलीमध्ये विश्वास, स्थिरता आणि आर्थिक प्रगतीचे वातावरण निर्माण होण्यास मदत होत आहे. एकेकाळी औद्योगिक विकासासाठी आव्हानात्मक प्रदेश मानला जाणारा गडचिरोली जिल्हा आता समावेशक आणि शाश्वत विकासाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे, जो स्थानिक आणि आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना अर्थपूर्ण संधी देत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button