ताज्या घडामोडी

*गडचिरोली नगर परिषदेस ‘ऑटोमॅटिक स्वीपिंग मशीन’ उपलब्ध :लोकार्पण सोहळा संपन्न*

गडचिरोली दि. 12 – गडचिरोली शहराच्या स्वच्छता व पर्यावरण संवर्धनासाठी मा. डॉ. मिलिंद नरोटे (आमदार, गडचिरोली विधानसभा क्षेत्र) यांच्या प्रयत्नातून , लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांच्या CSR निधीतून गडचिरोली नगर परिषदेस ‘ऑटोमॅटिक स्वीपिंग मशीन’ उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या यंत्राचा लोकार्पण सोहळा आज सकाळी कर्तव्य कक्ष, चामोर्शी मार्ग, गडचिरोली येथे माजी खासदार श्री अशोकराव नेते,मा. डॉ. मिलिंद नरोटे (आमदार, गडचिरोली विधानसभा क्षेत्र यांचे शुभ हस्ते व मा. श्री. मुक्तेश्वर काटवे
आरोग्य व स्वच्छता सभापती, नगर परिषद गडचिरोली, श्री सूर्यकांत पिदुरकर, मुख्याधिकारी,नगर परिषद, गडचिरोली व
मा.श्री नटराजन एम.उपाध्यक्ष, लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड, गडचिरोली यांच्या उपस्थितीत पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button