*उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात तात्पुरते स्थलांतरित*
गडचिरोली, (जिमाका), दि. ०९ फेब्रुवारी २०२६ :
उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गडचिरोली यांचे कार्यालय सध्या एस.टी. डेपो समोर, धानोरा रोड, गडचिरोली येथे कार्यरत होते. मात्र सदर कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले असल्याने, कार्यालयीन कामकाजासाठी हे कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, गडचिरोली (एलआयसी कार्यालयाजवळ) येथे स्थलांतरित करण्यात आले असून, सध्या तेथूनच सर्व प्रशासकीय व कार्यालयीन कामकाज पार पाडले जात आहे.
तरी, नागरिकांनी तसेच संबंधित शासकीय कार्यालये, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी पुढील सर्व प्रशासकीय, न्यायालयीन तसेच कार्यालयीन कामकाजासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, गडचिरोली (एलआयसी कार्यालयाजवळ) येथे संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी एम. अरूण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
—



