गडचिरोली जिल्हयातील पुरपरिस्थीती

दिनांक 08.07.2025 रोजी जिल्हयातील पुरपरिस्थीती पाहता गोसीखुर्द धरणाचे 11000 कयुमेक्स ने पाण्याचा विसर्ग केल्यामुळे कोटगल (गडचिरोली) बॅरेजचे 42 दरवाजे खुले करण्यात आले. धरणाच्या गेटचे Bed level 189 RL आहे. दुपारी 12 वाजता मोजणी केले असता 194 RL झाली. पुढील 3 तासात पाणी वाढून 197 RL होऊ शकते. तेव्हा वैनगंगा नदीचे back water नाल्यामध्ये येऊन धरण ते कोटगल मार्ग बंद होऊ शकतो.
सन 2024 मध्ये धरणाच्या कामावरील पश्चिम बंगाल व स्थानिक मजूर अडकून राहील्याने त्यांचे जिवीताला कोणतीही हानी होऊ नये म्हणून प्रशासनास मोठी कसरत करुन बोटीव्दारे नागरिकांना बाहेर काढावे लागले. तीच पुनरावर्ती यावर्षी होऊ नये म्हणून तालुका प्रशासनाकडून वेळीच खबरदारी व वेळीच दखल घेऊन एकूण 132 मजुरांना सुरक्षित स्थळी वाहनद्वारे बाहेर स्थलांतरित करण्यात आले. अजयदीप कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट कंपनी मुंबई कडून सर्व मजूराची भोजन व निवासाची व्यवस्था कोहळे हॉल विसापूर (गडचिरोली) येथे करण्यात आली. असे श्री चंदु प्रधान
नायब तहसिलदार गडचिरोली यांनी कळविले आहे