*मराठी पत्रकार परिषद उपाध्यक्षपदी अविनाश भांडेकर*

मुंबई : मराठी पत्रकार परिषद केंद्रीय उपाध्यक्षपदी अविनाश भांडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मराठी पत्रकार परिषद ही ३ डिसेंबर १९३९ रोजी स्थापन झालेली देशातील मराठी पत्रकारांची सर्वात मोठी संघटना असून या संघटनेला आचार्य प्र. के. अत्रे यांच्यासारखे अनेक जेष्ठ साहित्यिकांचा वारसा लाभला आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या नुकताच पुणे येथे झालेल्या बैठकीत उपाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.. ऑगस्ट २०२६ पर्यत नवे उपाध्यक्ष कार्यरत असतील.. विभागीय चिटणीस आणि उपाध्यक्षांनी विभागात संघटनात्मक काम वाढविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल..
नवे उपाध्यक्ष पुढील प्रमाणे..
विदर्भ* : अविनाश भांडेकर, (अध्यक्ष प्रेस क्लब गडचिरोली)
*पश्चिम महाराष्ट्र* : गणेश मोकाशी, संपादक राज्य लोकतंत्र, (पुणे)
*कोकण विभाग*: हेमंत वणजू, रत्नागिरी
*मराठवाडा* : प्रकाश कांबळे, (नांदेड)
*उत्तर महाराष्ट्र* :गो. पी. लांडगे, (धुळे)
आणि चंद्रकांत बर्डे (बुलढाणा)
सर्व नवीन उपाध्यक्षांचे एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई, डिजिटल मिडियाचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, राज्य प्रसिध्दीप्रमूख संदीप कुलकर्णी यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत..