ताज्या घडामोडी

*पत्रकार दिनानिमित्त ‘जिल्हा गौरव पुरस्कार’ सोहळा व गीत गायन स्पर्धेचे आयोजन*

गडचिरोली : पत्रकार दिनाच्या निमित्ताने प्रेस क्लब गडचिरोलीच्या वतीने ‘गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार प्रदान सोहळा’ व ‘गीत गायन स्पर्धेचे बक्षीस वितरण’ कार्यक्रम दि. 6 जानेवारी 2025 रोजी जिल्हा मध्यवर्ती बँक सभागृह, धानोरा रोड येथे दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या विशेष कार्यक्रमात लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा (भामरागड) चे संचालक आणि समाजसेवक मा. अनिकेत प्रकाश आमटे व सौ. समिक्षा अनिकेत आमटे यांना ‘गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार’ने सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून मा. सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार उपस्थित राहणार असून पुरस्कारांचे वितरण मा. देवेंद्रजी गावंडे, निवासी संपादक, दै. लोकसत्ता नागपूर (विदर्भ आवृत्ती) यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून मा. डॉ. प्रमोद मुनघाटे, सदस्य महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ, म.रा. हे मार्गदर्शन करणार आहेत. विशेष अतिथी म्हणून मा. आ. डॉ. मिलींद नरोटे (विधानसभा सदस्य, गडचिरोली), मा. अविश्यांत पंडा (जिल्हाधिकारी, गडचिरोली), मा. श्रीमती आयुषी सिंह (मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गडचिरोली), मा. निलोत्पल (जिल्हा पोलीस अधीक्षक, गडचिरोली) व मा. गजानन जाधव (जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली) उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. अविनाश भांडेकर, अध्यक्ष प्रेस क्लब, गडचिरोली भूषवणार आहेत.
या कार्यक्रमाला जास्तीत जास्त जनतेनी व स्पर्धकांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवावा असे आवाहन
प्रेस क्लब गडचिरोलीचे
उपाध्यक्ष – रोहिदास राऊत
सचिव – रुपराज वाकोडे
कोषाध्यक्ष – शेमदेव चापले
सहसचिव – सुरेश नगराळे, सदस्य- सुरेश पद्मशाली, नंदकिशोर काथवटे, मिलिंद उमरे, निलेश पटले, बिलास दशमुखे ,मनोज ताजने, सहयोगी सदस्य : नंदकिशोर पोटे, इरफान पठान, आशिष अग्रवाल, मनिष कासर्लावार, मनिष रक्षमवार, रोमित तोम्बर्लावार, संदिप कांबळे यांनी केले आहे.
गीत गायन स्पर्धा सकाळी १० वाजता पासून घेण्यात येणार असून विजेत्यांचा सन्मान आणि पुरस्कार वितरण देखील या सोहळ्यात करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button