ताज्या घडामोडी

राज्यातील आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण लागू*

*एसईबीसी प्रवर्गाला दहा टक्के आरक्षण*

*•*महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने घेतला निर्णय*

मुंबई दि. ३१ : सरकारने आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय गट-क आणि गट-ड संवर्गातील पदांसाठी सुधारित आरक्षण आणि बिंदूनामावली निश्चित केली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जारी करण्यात आला आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आरक्षण उपसमितीने याबाबत केलेल्या शिफारशीनंतर ही बिंदूनामावली निश्चित करण्यात आली आहे.

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या आरक्षणासह नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या आठ आदिवासीबहुल जिल्ह्यांसाठी सुधारित आरक्षण विहित करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना सुचवण्यासाठी महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यात आली होती. या समितीमध्ये अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, कृषीमत्री माणिकराव कोकाटे, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक ऊईके आदींचा समावेश होता. या उपसमितीने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे.

या आठ आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये ही आरक्षण बिंदूनामावली लागू करण्यात येणार आहे. या जिल्ह्यांमधील इतर मागास वर्ग, तसेच विमुक्त जाती/भटक्या जमाती या प्रवर्गाची प्रचलित आरक्षणाची टक्केवारी आणि लोकसंख्या विचारात घेऊन गट-क आणि गट-ड संवर्गातील सरळसेवा भरतीसाठी सुधारित आरक्षण निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर या सुधारित आरक्षणानुसार बिंदूनामावली देखील विहित करण्यात आली होती.
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ अन्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (एसईबीसी) प्रवर्गास शासकीय सेवेतील सरळसेवा पदभरतीस तसेच शैक्षणिक संस्थांतील प्रवेशास १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

*नाशिक, धुळे, नंदुरबार आणि पालघर जिल्ह्यांसाठी आरक्षण :* नाशिक, धुळे, नंदुरबार आणि पालघर या प्रत्येक जिल्ह्यात अनुसूचित जातींसाठी १०% , अनुसूचित जमातींसाठी २२% , विमुक्त जाती (अ) साठी ३% , भटक्या जमाती (ब) साठी २.५% , भटक्या जमाती (क) साठी ३.५% , भटक्या जमाती (ड) साठी २% , विशेष मागास प्रवर्गासाठी २% , इतर मागास वर्गासाठी १५% , एसईबीसीसाठी ८% , ईडब्ल्यूएससाठी ८% आणि खुला प्रवर्गासाठी २४% आरक्षण विहित करण्यात आले आहे.
*यवतमाळ जिल्ह्यासाठी आरक्षण :* यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातींसाठी १२% , अनुसूचित जमातींसाठी १४% , विमुक्त जाती (अ) साठी ३% , भटक्या जमाती (ब) साठी २.५% , भटक्या जमाती (क) साठी ३.५% , भटक्या जमाती (ड) साठी २% , विशेष मागास प्रवर्गासाठी २% , इतर मागास वर्गासाठी १७% , एसईबीसीसाठी ८% , ईडब्ल्यूएससाठी ८% आणि खुला प्रवर्गासाठी २८% आरक्षण लागू करण्यात आले आहे.

*चंद्रपूर जिल्ह्यासाठी आरक्षण :* चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातींसाठी १३% , अनुसूचित जमातींसाठी १५% , विमुक्त जाती (अ) साठी ३% , भटक्या जमाती (ब) साठी २.५% , भटक्या जमाती (क) साठी ३.५% , भटक्या जमाती (ड) साठी २% , विशेष मागास प्रवर्गासाठी २% , इतर मागास वर्गासाठी १९% , एसईबीसीसाठी ८% , ईडब्ल्यूएससाठी ८% आणि खुला प्रवर्गासाठी २४% आरक्षण विहित करण्यात आले आहे.
*गडचिरोली जिल्ह्यासाठी आरक्षण :* गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातींसाठी १२% , अनुसूचित जमातींसाठी २४% , विमुक्त जाती (अ) साठी २% , भटक्या जमाती (ब) साठी २% , भटक्या जमाती (क) साठी २% , भटक्या जमाती (ड) साठी २% , विशेष मागास प्रवर्गासाठी २% , इतर मागास वर्गासाठी १७% , एसईबीसीसाठी ८% , ईडब्ल्यूएससाठी ८% आणि खुला प्रवर्गासाठी २१% आरक्षण लागू करण्यात आले आहे.
*रायगड जिल्ह्यासाठी आरक्षण* : रायगड जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातींसाठी १२% , अनुसूचित जमातींसाठी ९% , विमुक्त जाती (अ) साठी ३% , भटक्या जमाती (ब) साठी २.५% , भटक्या जमाती (क) साठी ३.५% , भटक्या जमाती (ड) साठी २% , विशेष मागास प्रवर्गासाठी २% , इतर मागास वर्गासाठी १९% , एसईबीसीसाठी १०% , ईडब्ल्यूएससाठी ९% आणि खुला प्रवर्गासाठी २८% आरक्षण विहित करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button