ताज्या घडामोडी

कोपर्शी चकमक चौकशीसंदर्भात निवेदन आमंत्रित

गडचिरोली,(जिमाका),दि.18: पोलीस स्टेशन, कोठी, उपविभाग भामरागड अंतर्गत, मौजा कोपर्शी जंगल परिसरात दिनांक 21 आक्टोबर 2024 रोजी झालेल्या पोलीस – नक्षल चकमकी दरम्यान दोन पुरुष व तीन महिला मृतदेह आढळले होते. या घटनेतील मृत्युच्या कारणांचा शोध लावणे आवश्यक असल्याने, सदर प्रकरणात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 196 अन्वये दंडाधिकारी चौकशी करण्यात येत आहे.
तरी या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशी मध्ये भाग घेऊ इच्छीणाऱ्यानी आपले लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभगीय दंडाधिकारी, एटापल्ली यांच्याकडे 15 दिवसाचे आत किंवा तत्पूर्वी सादर करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी नमन गोयल यांनी केले आह

0000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button