*सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल गडचिरोली दौऱ्यावर: विकासकामे आणि जिल्हा वार्षिक योजनेचा घेणार आढावा*

गडचिरोली दि. २५ :
राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय आणि कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री ना. ॲड. आशिष जयस्वाल हे शुक्रवार, दिनांक २६ डिसेंबर आणि शनिवार, २७ डिसेंबर २०२५ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते विकास कामांचा आढावा आणि विविध जिल्हास्तरीय उपक्रमांना भेटी देणार आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांचे गडचिरोलीत आगमन झाल्यावर ते मौजा कनेरी येथील शंकरपट मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय पशु प्रदर्शनास भेट देतील. त्यानंतर दुपारी १.३० वाजता जिल्हा परिषद गडचिरोली येथे जिल्हास्तरीय सरस विक्री व प्रदर्शनीची पाहणी करून दुपारी २.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध विषयांवर आढावा बैठक घेतील. सायंकाळी ते जिल्हा परिषदेच्या शालेय बालक्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि रात्री ८.०० वाजता वाकडी येथील शाळेत आयोजित इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विभागीय सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करतील.
शनिवारी २७ डिसेंबर रोजी राज्यमंत्री ॲड. जयस्वाल सकाळी ९.३० वाजता मौजा चुरचुरा येथे ते संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. तद्नंतर आरमोरी तालुक्यातील इंजेवाडी आणि देऊळगाव या गावांना भेट देऊन वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांचे भेट देतील. दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक योजनेबाबत संबंधित यंत्रणांशी सविस्तर चर्चा करतील. सोयीनुसार विश्रामगृह येथे आगमन व राखीव.


