*जिल्हास्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा शुभारंभ*

गडचिरोली दि.२३: जिल्हा परिषद गडचिरोलीच्या शिक्षण विभागामार्फत आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा, अधिकारी-कर्मचारी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा २०२५-२६ चा उद्घाटन सोहळा आज उत्साहात पार पडला. आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचा नावलौकिक मिळवून देणारी खेळाडू कु. श्वेता मंजुषा भाष्कर कोवे हिच्या नावाने जिल्हा परिषदेच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या ‘श्वेता कोवे क्रीडानगरी’ येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आमदार सुधाकर अडबाले आणि आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, प्रकल्प संचालक राहुल काळभोर, प्राथमिक शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे यांच्यासह जिल्हा परिषदेचे विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख श्री. राजु वडपल्ली, श्री. धनंजय दुम्पेट्टीवार आणि श्री. अमित मानुसमारे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार विस्तार अधिकारी (शिक्षण) श्री. जितेंद्र सहाळा यांनी मानले. या स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी श्री. विवेक नाकाडे आणि श्री. वैभव बारेकर यांच्यासह संपूर्ण चमू परिश्रम घेत आहे.


