ताज्या घडामोडी
*मतदान प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी*

गडचिरोली, दि. २० : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक–२०२५ अंतर्गत सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेची जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज विविध मतदान केंद्रांवर भेट देऊन पाहणी केली.
यावेळी मतदार यादी, मतदानाची टक्केवारी, ईव्हीएम मशीनची स्थिती तसेच मतदारांसाठी उपलब्ध सुविधांचा त्यांनी आढावा घेतला व मतदान प्रक्रियेदरम्यान नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, याबाबत आवश्यक सूचना दिल्या.
गडचिरोली नगरपरिषदेतील तीन प्रभागांसाठी ११ मतदान केंद्रांवर तर आरमोरी नगरपरिषदेतील एका प्रभागासाठी ३ मतदान केंद्रांवर आज मतदान घेण्यात आले.


