ताज्या घडामोडी
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीत* *जिल्ह्यात एक कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा करणार शुभारंभ*

गडचिरोली दि.21 : “हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एक कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 22 जुलै रोजी करण्यात येणार आहे.
येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात दुपारी २ वाजता आयोजित या कार्यक्रमाला सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार डॉ. नामदेव किरसान, आ. सुधाकर अडबाले, आ. डॉ. अभिजीत वंजारी, आ. धर्मरावबाबा आत्राम, आ. डॉ. मिलींद नरोटे, मा. रामदास मसराम, तसेच अपर मुख्य संचिव(वने) तथा जिल्ह्याचे पालक सचिव मिलींद म्हैसकर उपस्थित राहणार असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व मुख्य वनसंरक्षक रमेशकुमार यांनी कळविले आहे.