महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे गोशाळाची नोंदणी करण्याचे आवाहन
गडचिरोली, (जिमाका) दि.06: महाराष्ट्र राज्यात पशुंचे संवर्धन संरक्षण व कल्याण करण्यासाठी व त्यासाठी कार्यरत संस्थाचे पर्यवेक्षण करण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोग अधीनीयम 2023 दिनांक 28/04/2023 च्या शासन राजपत्रात प्रसिध्द अधीसुचनेनुसार स्थापन झाला आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग अधीनीयम 23 मधील प्रकरण 3 नियम क्रं. 12 अन्वये आयोगाच्या स्थापनेनंतर राज्यातील गोशाळांची नोंदणी आयोगाकडे करणे बंधनकारक आहे.
महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे गोशाळा नोंदणीची कार्यवाही ही बऱ्याच दिवसापासुन सुरु आहे. जिल्हयातील गोशाळा नोंदणीचे 100 % काम हे दिनांक 30 मे 2025 अखेर पुर्ण कराव्या अशा सुचना गोसेवा आयोगाकडुन निर्गमीत करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र गोसेवा आयोग अधीनीयम 23/2023 मधील प्रकरण तीन संस्थाची नोंदणी कलम 12 अन्वये या नियमाच्या प्रारभांच्या दिनांकास अस्तीत्वात असलेल्या संस्थांनी सहा महिन्याच्या आत आयोगाकडे नोंदणी करणे गरजेचे आहे व नवीन स्थापन झालेल्या संस्थानी तीन महिन्याच्या आत आयोगाकडे नोंदणी करावयाची आहे.
तथापी 30 मे 2025 नंतर पुर्वीपासुन अस्तीत्वात असलेल्या अनोंदणीकृत गोशाळा कायद्यान्वे ग्राहय धरण्यात येणार नाही व संबधीत गोशाळोची मान्यत रदद करण्यात येवुन गोशाळेतील पशुधन इतर नोंदणीकृत गोशाळेत हलविण्यात येईल व गोशाळेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.असे आयोगाकडुन कळविण्यात आलेले आहे.
तरी जिल्हयातील कार्यरत सर्व गोशाळा यांनी वर दिलेल्या तारखेच्या आत नोंदणी करावी. असे आवाहन डॉ.विलास अ. गाडगे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त गडचिरोली यांनी केले आहे.
0000