ताज्या घडामोडी

पशुसंवर्धन विभागाच्या विविध वैयक्तीक लाभाच्या योजनासांठी अर्ज करण्याचे आवाहन

गडचिरोली, (जिमाका) दि.06: राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देत त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमाव्दारे ग्रामिण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.
विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातुन ग्रामिण भागातील पशुपालक / शेतकरी बांधवांना स्वंयरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबध्द असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तीक लाभाच्या योजना अंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करणेसाठी राज्यस्तरीय नाविण्यपुर्ण योजनेमध्ये गेली चार वर्ष ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरु करण्यात आली आहे. आता याबरोबर जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सदर संगणक प्रणाली लागु करण्यात आली आहे. यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरीता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागु नये यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी सन 2021-22 पासुन पुढील 5 वर्षापर्यंत म्हणजे सन 2025-26 लागु ठेवण्याची सोय केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असुन, त्याची प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदार्ज केव्हा लाभ मिळेल हे कळु शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरण किंवा इतर बाबीकरीता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.
त्यानुसार नाविण्यपुर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई / म्हशीचे गट वाटप करणे, शेळी / मेंढी गट वाटप करणे, 1000 मांसल कुक्कूट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कूट पिलांचे वाटप व 25+3 तलंगा गट वाटप या योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2025-26 या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबीमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक / शेतकरी बांधव, सुशिक्षीत बेरोजगार युवक / युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ:- https.//ah.mahabms.com
अँड्राईड मोबाईल ॲप्लिकेशनचे नांव:- AH-MAHABMS
(Google Play स्टोरवरील मोबाईल ॲपवर उपलब्ध)
अर्ज करण्याचा कालावधी:- 02/05/2025 ते 01/06/2025
टोल फ्री क्रमांक:- 1962 (वेळ – सोमवार ते शनीवार सकाळी 7.00 ते सांयकाळी 6.00)
अधीक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना, पशुसंवर्धन विभाग (पंचायत समिती,जिल्हा परिषद), जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयात संपर्क साधावा.

योजनांची संपुर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपुर्ण तपशील या संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील. या संगणप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असुन, अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणी बहतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरीता स्वत:चे मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावार अर्जाच्या स्थीतीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थीतीत अर्जदाराने योजनेअंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलु नये व मागिल वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही.
योजनेबाबत अधिक माहितीसाठी वरील तक्यात दर्शविलेल्या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. विलास गाडगे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, गडचिरोली यांनी केले आहे.
0000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button