ताज्या घडामोडी

*रिक्त महसुल मंडळ क्षेत्रात आधार नोंदणी संच वितरणासाठी अर्ज स्वीकारण्यास 9 मे पर्यंत मुदतवाढ*

गडचिरोली, दि. 2 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्यामार्फत जिल्ह्यातील रिक्त महसुल मंडळ क्षेत्रांमध्ये आधार नोंदणी सेवा सुलभ करण्याच्या उद्देशाने आधार नोंदणी संचांचे वितरण करण्यात येत आहे. माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत प्राप्त झालेल्या संचांच्या आधारे, गडचिरोली जिल्ह्यातील एकूण 31 महसुल मंडळ क्षेत्रांमध्ये आधार नोंदणी सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

या सुविधेसाठी “आपले सरकार सेवा केंद्र चालक” (महा-ई सेवा केंद्र चालक) यांच्याकडून पूर्वी 27 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, अपेक्षित प्रमाणात अर्ज प्राप्त न झाल्याने अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवून आता 9 मे 2025 पर्यंत करण्यात आली आहे.

यासंदर्भात जाहीरात, रिक्त महसुल मंडळांची यादी व अर्जाचा नमुना जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर www.gadchiroli.gov.in उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

अर्ज सादर करण्यासाठी इच्छुक केंद्र चालकांनी लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन निवासी उप जिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia