*आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांचा दौरा*
गडचिरोली, (जिमाका) दि. 23 एप्रिल 2025:
आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके हे दिनांक 25 व 26 एप्रिल 2025 रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात विविध विकासकामांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यांच्या दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
25 एप्रिल 2025 (शुक्रवार) रोजी सायंकाळी 5.00 वाजता मंत्री प्रा. अशोक उईके हे जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे जिल्हा प्रकल्प कार्यालय तसेच आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या धान खरेदी योजनेचा व इतर विकासकामांचा सविस्तर आढावा घेणार आहेत.
26 एप्रिल 2025 (शनिवार) रोजी सकाळी 9.00 ते 10.00 या वेळेत ते अहेरी येथील विश्रामगृहात आदिवासी विद्यार्थी व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा करतील. त्यानंतर सकाळी 10.00 ते 12.00 दरम्यान एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी येथे प्रकल्प कार्यालय तसेच धान खरेदी योजनेचा आढावा घेतला जाईल. दुपारी 1.00 ते 3.00 या वेळेत ते एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी येथे आयोजित लाभार्थी संमेलनात सहभागी होतील आणि त्यानंतर दुपारी 3.00 वाजता तेथेच पत्रकार परिषदेला संबोधित करतील.
—