*गडचिरोली येथे २६ जानेवारी ला होणार वृत्तपत्र विक्रेत्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन*

*येत्या 26 व 27 जानेवारी 2025 ला गडचिरोली येथे वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. त्याच संदर्भात आता पर्यंत झालेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तसेच पुढील कामकजाची रुपरेषा ठरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष मा. श्री. बालाजी पवार साहेब यांनी नुकतीच गडचिरोली येथे भेट दिली. त्यावेळी त्यांचे सोबत राज्य संघटनेचे विभागीय संघटन सचिव श्री. विनोद पन्नासे (चंद्रपुर), राज्य कार्यकारणी सदस्य श्री. चंद्रकांत घाटोळ (नांदेड) हे होते.*
*भेटी दरम्यान श्री. पवार साहेबांनी आता पर्यंत झालेल्या कामकाजाची माहिती घेतली आणि झालेल्या कामावर समाधान व्यक्त केले तसेच पुढील कामा संदर्भात मार्गदर्शन केले आणि काही सुचना केल्या. यावेळी त्यांनी नियोजित कार्यक्रमाच्या स्थळाची पाहणी सुद्धा केली व कार्यक्रम स्थळ खुपच सुंदर असल्याचे म्हणाले. तसेच श्री पन्नासे साहेब, श्री. घाटोळ साहेब यांनी सुद्धा अधिवेशनाच्या तयारी विषयी काही मार्गदर्शक सुचना केल्या.*
*गडचिरोली शहरात प्रथमच एखादे राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. त्यामुळे हे अधिवेशन अधिकाधिक चांगले करण्याचा प्रयत्न करू असे गडचिरोली संघटनेने म्हटले आहे.*
*आजच्या बैठकी ला गडचिरोली संघटनेचे अध्यक्ष श्री अनिल बाळेकरमकर, सचिव श्री लोमेश बांबाळे, कोषाध्यक्ष श्री प्रशांत वाढई, सह सचिव श्री मारोती बाळेकरमकर, प्रसिद्धी प्रमुख श्री अंकुश बोबाटे, सदस्य श्री राजेन्द्र गव्हारे, संजय आकरे, रविंद्र कांबळे, संदिप आकरे, देवेंद्र बारापात्रे, आदि सदस्य उपस्थित होते.