ताज्या घडामोडी

*सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल क्रीडा स्पर्धेसाठी ४ जुलैपर्यंत अर्ज करा*

गडचिरोली दि. १ : क्रीडा व युवक सेवा अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने सुब्रोतो मुखर्जी कप जिल्हा स्तरीय फुटबॉल क्रीडा स्पर्धा सन 2024-25 चे आयोजन नेताजी सुभाषचंद्र हायस्कुल तथा ज्यु. कॉलेज, सुंदरनगर ता. मुलचेरा जि. गडचिरोली येथे करण्यात येत आहे. सबज्युनिअर व ज्युनिअर संघानी www.subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू व संघांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा व सांस्कृतीक भवन, कॉम्पलेक्स, गडचिरोली येथे ऑफलाईन प्रवेश अर्ज दि. 04 जुलै, 2024 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.
सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंकरीता यावर्षी पासून पुढे 14 वर्षाखालील मुले (सबज्युनिअर) या ऐवजी 15 वर्षाआतील मुले या वयोगटाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. सबज्युनियर 15 वर्षे वयोगटातील मुलांकरीता दि. 1 जानेवारी 2010 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. तसेच ज्युनिअर 17 वर्षाखालील मुले व मुली दि. 1 जानेवारी 2008 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.
स्पर्धेत सहभागी खेळाडूकडे जन्मदाखला, आधारकार्ड, खेळाडू ओळखपत्र, पासपोर्ट असणे अनिवार्य आहे. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंची वैद्यकीय तपासणी होणार असून, त्यामध्ये एखादा खेळाडू अधिक वयाचा आढळल्यास संपुर्ण संघ बाद करण्यात येणार आहे.

प्रवेश अर्जावर खेळाडूचे संपुर्ण नांव, जन्मतारीख, वर्ग, आधार क्रमांक, शाळेचे नांव, पत्ता, शाळेचा युडायस क्रमांक, खेळाडू स्वाक्षरी, रजिस्टर नंबर, मोबाईल क्रमांक, संस्था प्रमुख / मुख्याध्यापक यांचे स्वाक्षरीने पाठवावा. 15 वर्षाआतील खेळाडूंकरीता वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे.
तरी संघाचा प्रवेश अर्ज विहीत मुदतीत कार्यालयात सादर करुन जास्तीत जास्त संघांनी / शाळांनी सहभागी व्हावे. प्रवेशिकेची एक प्रत स्पर्धास्थळी देणे व संघ वेळेवर स्पर्धा स्थळी उपस्थित ठेवणे अनिवार्य आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे राज्य क्रीडा मार्गदर्शक (9503331133) यांना कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, भास्कर घटाळे यांनी केले.

*स्पर्धा आयोजन : स्पर्धा आयोजन स्थळ :- नेताजी सुभाषचंद्र हायस्कुल तथा ज्यु. कॉलेज, सुंदरनगर ता. मुलचेरा*
15 वर्षे मुले व 17 वर्षे मुली : दि. 05 व 06 जुलै 2024
संघ उपस्थिती :- दि. 05 जुलै 2024 रोजी सकाळी 09.00 वाजेपर्यंत
17 वर्षे मुले : दि. 06 व 07 जुलै 2024
संघ उपस्थिती :- दि. 06 जुलै 2024 रोजी सकाळी 09.00 वाजेपर्यंत
संपर्क क्रमांक :- तालुका क्रीडा संयोजक, मुलचेरा (9420013435)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button