ताज्या घडामोडी

*जिल्हा परिषदेंतर्गत कृषि निविष्ठा तक्रार निवारण कक्ष स्थापन*

 

गडचिरोली,दि.26(जिमाका): जिल्यातील बियाणे, खते व किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणींचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर ‘निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष’ स्थापन करण्यात आलेला आहे. शेतकरी, कंपनी प्रतिनिधी, बियाणे, खते व किटकनाशके विक्रेते व नागरिकांनी त्यांच्या तक्रारी संबंधात सदर नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ०७ या वेळेत भ्रमणध्वनी क्रमांक ८२७५६९०१६९ तसेच टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच आपल्या तक्रारी किंवा अडचणी dsaogad15@gmail.com / adozpgad@gmail.com या इमेलवर पाठविण्याचे आवाहन कृषि विकास अधिकारी प्रदीप तुमसरे यांनी केले आहे.
जिल्हास्तरावर १ व तालुकास्तरावर प्रत्येकी १ असे जिल्ह्यात एकूण १३ भरारी पथके स्थापन केलेले आहेत, बोगस बियाणे, खते विक्री करतांना निदर्शनास आल्यास परवाना रद्द करण्यात येईल व कायदेशीर कार्यवाही केली जाईल, यासाबंधित कृषी विभागाचे पथक बारीक लक्ष ठेऊन आहे.- श्री.प्रदीप तुमसरे (कृषि विकास अधिकारी, जि.प. गडचिरोली)
बियाणे व खते यात बोगस कंपन्यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये याची काळजी कृषी विभागामार्फत घेतली जात आहे, तसेच युरिया खत ज्यादा दराने विक्री केल्याचे व युरिया सोबत इतर अनावश्यक खते लिंकिंग करीत असल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे जिल्हा मोहीम अधिकारी, कृषि विभाग, आनंद पाल यांनी कळविले आहे.
0000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button