ताज्या घडामोडी

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात प्रचार समाप्त : शुक्रवारी मतदान

 

*मतदार संघाची व्याप्ती* : 12-गडचिरोली-चिमुर हा लोकसभा मतदार संघ २००९ मध्ये नव्याने अस्तित्वात आला. तीन जिल्ह्यात पसरलेला हा मतदारसंघ आदिवासी जमातीसाठी राखीव आहे.या लोकसभा मतदार संघात आरमोरी, गडचिरोली, अहेरी हे गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघ तसेच गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी व चिमुर असे एकूण सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.
*उमेदवार* : 12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातून एकूण 10 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या उमेदवारांचे नाव, पक्ष व चिन्ह पुढीलप्रमाणे आहे. अशोक महादेवराव नेते, भारतीय जनता पार्टी (कमळ), डॉ. नामदेव दसाराम किरसान, इंडियन नॅशनल काँग्रेस (हात), योगेश नामदेवराव गोन्नाडे, बहुजन समाज पार्टी (हत्ती), धीरज पुरूषोत्तम शेडमागे, जनसेवा गोंडवाना पार्टी (करवत), बारीकराव धर्माजी मडावी, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी (शिट्टी), सुहास उमेश कुमरे,भीमसेना (ऑटोरिक्षा), हितेश पांडूरंग मडावी, वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर), करण सुरेश सयाम, अपक्ष (ऊस शेतकरी), विलास शामराव कोडापे, अपक्ष(दूरदर्शन), विनोद गुरुदास मडावी, अपक्ष (अंगठी)
*मतदार* : लोकसभा मतदार संघातील मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार 8 लाख 14 हजार 763 पुरूष, 8 लाख 2 हजार 434 महिला व 10 तृतीयपंथी असे एकूण 16 लाख 17 हजार 207 मतदार आहेत.याशिवाय भारतीय सैन्य दलात कार्यरत 1483 सेवा मतदार (सर्व्हीस व्होटर) मिळून एकूण मतदार संख्या 16 लाख 18 हजार 690 झाली आहे. पुरूष मतदारांची टक्केवारी 50.38 तर महिला मतदारांची टक्केवारी 49.62 अशी आहे. 18 ते 19 वयोगटात 24 हजार 26 नवमतदारांनी नोंदणी केली आहे. यात 13 हजार 261 पुरूष, 10 हजार 764 महिला व 1 तृतीयपथीं नवमतदाराचा समावेश आहे.
*मतदान केंद्र* : लोकसभा निवडणुकीकरिता विधानसभा मतदार संघनिहाय एकूण 1891 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. यात आमगाव 311, आरमोरी 302, गडचिरोली 356, अहेरी 292, ब्रम्हपुरी 316 तर चिमुर विधानसभा मतदारसंघात 314 मतदान केंद्र राहणार आहेत. यातील 16 मतदान केंद्र महिलांद्वारे नियंत्रीत केली जाणार आहेत तर 6 मतदान केद्र दिव्यांग व 6 मतदान केंद्र युवा मतदान अधिकाऱ्यांमार्फत नियंत्रीत केली जाणार आहेत.
1891 मतदान केंद्रामध्ये 300 पेक्षा कमी मतदार असलेली 30 मतदान केंद्र असून 300 ते 800 मतदार असलेली 755, 800 ते 1000 साठी 536, 1000- ते 1200 मतदार असलेली 403 आणि 1200 ते 1500 मतदार असलेली 165 मतदान केंद्र आहेत. कोणत्याही मतदान केंद्रावर 1500 पेक्षा अधिक मतदार नाहीत. यातील 319मतदान केंद्रे संवेदनशील तर 200 केंद्र अतिसंवेदनशील व १६ मतदान केंद्रांचे तीव्रसंवेदनशील असे वर्गीकरण करण्यात आले आहे.
*मतदान यंत्र* : लोकसभा मतदारसंघातील 1891 मतदान केंद्रांकरिता 2330 बॅलेट युनिट (बीयू), 2330 कंट्रोल युनीट(सीयू) आणि 2517 व्हीव्हीपॅट उपलब्ध झाल्या आहेत. यापैकी आमगाव विधानसभा मतदारसंघात (बीयू – 404, सीयू – 404 आणि व्हीव्हीपॅट – 435), आरमोरी विधानसभा मतदारसंघात (बीयू – 362, सीयू – 362 आणि व्हीव्हीपॅट – 392), गडचिरोली विधानसभा मतदारसंघात (बीयू – 427, सीयू – 427 आणि व्हीव्हीपॅट – 462), अहेरी विधानसभा मतदारसंघात (बीयू – 350, सीयू – 350 आणि व्हीव्हीपॅट – 379), ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात (बीयू – 395, सीयू – 395 आणि व्हीव्हीपॅट – 426) आणि चिमुर विधानसभा मतदारसंघात (बीयू – 392, सीयू – 392 आणि व्हीव्हीपॅट – 423) असे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मतदानयंत्र निश्चित करण्यात आली आहेत. या मतदान यंत्राची सरमिसळ निवडणूक निरीक्षक व उमेदवारांचे प्रतीनिधी यांच्या उपस्थितीत करण्यात येवून ती मतदानासाठी तयार करण्यात आली आहेत.
*मनुष्यबळ* : निवडणुक कामासाठी लोकसभा मतदार संघात 16 हजार 332 अधिकारी कर्मचारी सेवा देणार असून यात अ-वर्ग 427, ब-वर्ग 791, क-वर्ग 13 हजार 954 आणि ड-वर्गातील 1162 कर्मचारी आहेत. यातील 8385 मतदान अधिकारी तर 228 क्षेत्रीय अधिकारी म्हणून निवडणूकीच्या दिवशी काम पाहणार आहेत. याव्यतिरिक्त पोलिस प्रशासनातर्फे सुमारे 16 हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची देखील निवडणूक कर्तव्यावर नियुक्ती करण्यात आली आहे.
*वाहने* : मतदान प्रक्रियेसाठी 344 जीप, 177 एस.टी.बस, 23 खाजगी बस, व 5 एम.आय.-17 हेलिकॉप्टर याशिवाय आचारसंहिता अंमलबजावणी पथकाकरिता 24 जीप, गृह मतदान तसेच सामान वाहतुकीकरिता 17 मालवाहु गाड्या उपलब्ध करून घेण्यात आल्या आहेत.
*मतदान : कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्या अनुषंगाने गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनात 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत गृह मतदानाची प्रक्रिया राबविण्यात आली.
*मतदार ओळखपत्र* : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 करिता ज्या मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र (ई-पिक) देण्यात आलेले आहे ते मतदार, मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाही, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त पुढीलप्रमाणे कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांचेद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र/राज्य सरकार/ सार्वजनिक उपक्रम/ पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जरी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार/आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र असे एकुण 12 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विविध पथके गठीत* :लोकसभा निवडणुक आचारसंहितेच्या काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस, राज्य उत्पादन शुल्क, आयकर विभाग, अमली पदार्थविरोधी विभाग व इतर विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकामार्फत तपासणी करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात 42 तर लोकसभा मतदार संघात 88 पथके नेमण्यात आली आहेत. यात व्हिडिओ सर्वेक्षण पथक (व्हीएसटी) 29, भरारी पथक (एफएसटी) 24, स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी) 29 व 6 श्राव्य पथक(अेटी) पथकांचा समावेश आहे. याशिवाय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी), जिल्हा नियंत्रण कक्ष यांचेमार्फतही निवडणूक गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. यासोबतच तसेच वननाक्यावर देखील तपासणी करण्यात येत आहे. या पथकांमार्फत 11 लाख रोख तसेच 60 हजार 494 लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली आहे.
*मदत* : मतदानाच्या दिवशी वृद्ध महिला तसेच नवीन मतदार यांना मतदार मित्र (मतदार दोस्ताल) म्हणून MSW, NSS चे 840 विद्यार्थी मदत करणार आहेत. त्यासोबतच महिला मुली यांना मदत करण्यासाठी मतदार सल्लेख (भगिनी ) म्हणून 530 मुली (MSW, NSS ) मदत करणार आहेत. आशा वर्कर अंगणवाडी सेविका महिला बचत गट यांच्या मतदान वाढीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्तीला मदत करण्यासाठी दिव्यांग दुताचे नेमणूक करण्यात आली आहे. 150 दिव्यांग दूत हे दिव्यांग शाळेचे कर्मचारी आहेत ते हे काम पाहणार आहेत.

000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button