ताज्या घडामोडी
*जिल्हाधिकारी यांची मार्कंडादेव मंदिराला भेट; यात्रेच्या व्यवस्थेचा घेतला आढावा*

गडचिरोली, दि. २६:
महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे लाखोंच्या संख्येने शिवभक्त दाखल झाले असून, यात्रेची योग्य व्यवस्था आणि भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज सायंकाळी मंदिर परिसराला भेट दिली व यात्रेच्या सुरळीत आयोजनाचा आढावा घेत त्यांनी भाविकांसाठी करण्यात आलेल्या सुरक्षा आणि सुविधांची पाहणी केली. तसेच प्रशासन व पोलिसांना गर्दी नियंत्रण, स्वच्छता आणि वैद्यकीय सुविधा याबाबत आवश्यक सूचना दिल्या.
भाविकांना सुरक्षित व सोयीस्कर दर्शनाची सुविधा मिळावी यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः दक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. भाविकांनी देखील शांततेने दर्शन करून प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.