*श्री प्रमोद तरारे यांना गडचिरोली प्रेस क्लब चा “गडचिरोली गौरव” पुरस्कार प्रदान : पत्रकार दिन समारंभात सत्कार*

*मुंबई दि.७ – श्री प्रमोद तरारे यांना गडचिरोली प्रेस क्लब तर्फे “गडचिरोली गौरव” पुरस्कार आज पत्रकार भवनात आयोजित पत्रकार दिन समारंभात मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डाॕ. प्रशान्त बोकारे व आमदार श्री. धर्मरावबाबा आत्राम यांचे हस्ते श्री. प्रमोदजी तरारे यांना सन्मान चिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला. श्री प्रमोद श्रावणजी तरारे सद्या महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाच्या खंडपिठावर न्यायिक सदस्यपदी मुंबई येथे कार्यरत आहेत.* *श्री प्रमोद तरारे हे नुकतेच धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई या पदावरून निवृत्त झाले होते. त्यांचा उत्तम कार्यकाळ लक्षात घेऊन शासनाने ही नियुक्ती केली आहे.* *श्री प्रमोद तरारे हे गडचिरोली येथे एडव्होकेट म्हणून कार्यरत असतांनाच सन २००८ मध्ये जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायाधिश म्हणून जालना येथे नियुक्ती झाली. त्यानंतर यवतमाळ, औरंगाबाद, वैजापूर व नागपूर येथे कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी अतिरीक्त प्रधान न्यायमुर्ती मुंबई शहर व विशेष न्यायाधिश सिबीआय म्हणून कार्य केले. त्यानंतर २०१८ ते २०२१ पर्यंत ते प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश नंदूरबार या पदावर कार्यरत होते.*