*आंबा लागवडीद्वारे निव्वळ उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतरी सहकार्य – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*

गडचिरोली, दि. २६ सप्टेंबर (जिमाका) :
सहकार व पणन विभाग, आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत गडचिरोली येथे नुकतेच आंबा – उत्तम कृषी पद्धती या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याचे निव्वळ उत्पन्न वाढावे यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य व मदत दिली जाईल, असे स्पष्ट केले. शेतकरी बांधवांनी या प्रशिक्षणाचा संपूर्ण लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
*गट शेती व आंबा लागवड करा: डॉ. भगवानराव कापसे*
या कार्यशाळेत गट शेती प्रणेते तथा फळबाग तज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी मार्गदर्शन करताना भारताची आंबा उत्पादकता इझ्राइल, ब्राझील, चीनपेक्षा कमी असल्याचे सांगितले. गडचिरोली जिल्ह्याचे हवामान व जमीन आंबा लागवडीसाठी अत्यंत पोषक असूनही गावरान वाणामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेत योग्य भाव मिळत नाही, असे त्यांनी नमूद केले. केशर व दशेरी या वाणांची घन लागवड धान पिकांच्या बांधावर किंवा सलग क्षेत्रात करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची लहान जमिनीची धारणा लक्षात घेता गटशेती शिवाय पर्याय नाही. अति घन व घन लागवडीविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच उत्तम कृषी पद्धती, काढणीनंतरचे तंत्रज्ञान, निर्यातक्षम आंबा बागा निर्मिती व निर्यात व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले.
*तज्ज्ञांचे मार्गदर्शन व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
कार्यशाळेत डॉ. किशोर झाडे, प्रमुख वरीष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली यांनी आंबा लागवडीतील एकात्मिक पिक व्यवस्थापन तंत्रज्ञान सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा, गडचिरोली श्रीमती प्रिती हिरळकर यांनी शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देऊन लागवडीस संपूर्ण सहकार्य केले जाईल असे सांगितले.
उद्यानविद्या तज्ज्ञ प्रा. सुचित लाकडे यांनी निर्यात पद्धती व मार्केटिंग याबाबत मार्गदर्शन केले, तर पिक संरक्षण तज्ज्ञ प्रा. पुष्पक बोथिकर यांनी आंबा पिकातील किडरोग व्यवस्थापनाची माहिती दिली. मॅग्नेटचे प्रतिनिधी श्री. ओमप्रकाश सुखदिवे यांनी लिंग समानता व सामाजिक समावेश या विषयावर व्याख्यान दिले.
प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी श्री. हेमंत जगताप, श्री. रुपेश माने, श्री. सुमेध कांबळे, विभाग फलोत्पादनाच्या श्रीमती मधुगंधा जुलमे, कृषि उपसंचालक श्री. अरुण वसवाडे, एस.डी.ओ. श्री. दिगंबर साबळे, तसेच आभारप्रदर्शन श्री. दीपक बेदरकर यांनी मानले.
यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव-भगिनींनी उपस्थित राहून या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
— प्रशासनाकडून सर्वोतरी सहकार्य*
*- जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*

—