ताज्या घडामोडी

*धरती आबा जन जाती ग्राम उत्कर्ष अभियान’ व छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर संपन्न*

गडचिरोली- धरती आबा जन जाती ग्राम उत्कर्ष अभियान’ व छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर महाराजस्व अभियान अंतर्गत 24 जुन रोजी मौजा मरेगावं अंतर्गत समाविष्ट गावे बेलगाव, राणखेडा, मौशिखांब येथे विशेष जागरूकता आणि सुविधा शिबिर आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्धाटक माजी आमदार श्री डा. देवराव होळी यांचे हस्ते करण्यात आले. आयोजीत अभियान कार्यक्रमास तहसिलदार गडचिरोली श्री संतोष आष्टीकर, गट विकास अधिकारी श्री अनिकेत पाटील, नायब तहसिलदार चंदु प्रधान, शाहिद शेख, श्री सोयाम वैदयकिय अधिकारी, श्रीमती परसा गट शिक्षणाधिकारी व इतर सर्व तालुका कार्यालयाचे प्रमूख उपस्थित होते.
हा उपक्रम अशा गावांना लक्ष्य करतो जिथे अनुसूचित जमाती (ST) ची लोकसंख्या ५०% पेक्षा जास्त आहे, ज्याचा उद्देश आदिवासी समुदायांना विविध सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सक्षम करणे आहे.

या शिबिरांमध्ये आधार नोंदणी, जन धन बँक खाते उघडणे, किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), आयुष्मान भारत आरोग्य कार्ड (ABHA), क्षयरोग मुक्त भारत उपक्रमांतर्गत सिकलसेल अॅनिमिया आणि क्षयरोगाची तपासणी आणि जागरूकता, लसीकरण, अधिवास, जात आणि उत्पन्न प्रमाणपत्रे, मनरेगा जॉब कार्ड, सामाजिक सुरक्षा पेन्शन (वृद्धापकाळ, विधवा, अपंगत्व), पंतप्रधान विश्वकर्मा, मुद्रा कर्ज आणि मनरेगा यासह उपजीविका योजना, महिला आणि बाल कल्याण कार्यक्रम जसे की पंतप्रधान मातृ वंदना योजना आणि आयसीडीएस सेवा आणि लसीकरण रेकॉर्ड अपडेट करणे यासारख्या विविध योजना आणि सेवांचा लाभ शिबीराचे माध्यमातुन देण्यात आले. यावेळी विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले. याचा नागरिकांनी पुरेपुर लाभ घेतलेला आहे.
कार्यक्रमाची प्रस्तावना चंदु प्रधान, नायब तहसिलदार यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजक तालुका प्रशासन गडचिरोली, मंडळ अधिकारी व सर्कलमधील सर्व ग्रा.म.अ., महसूल सेवक यांनी कार्यक्रमास सहकार्य केले. कार्यक्रमास गाव व परिसरातील बहुसंख्य नागरीक उपस्थित होते. सुत्रसंचालन अरविंद टेभूरणे ग्रा मं अ व आभार रुपेश गोरवार मंडळ अधिकारी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button