*सरदार वल्लभभाई पटेल व माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन*

*राष्ट्रीय एकता दिनाची शपथ*
गडचिरोली दि.३१: देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि ‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय एकता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
*राष्ट्रीय एकता दिनाची शपथ:*
यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कार्यालयात उपस्थित असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली. देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी तसेच देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका पोहोचवणारे विघटनकारी शक्तींचे आव्हान परतवून लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची शपथ सर्वांनी घेतली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टीमुळे आणि कृतीमुळे देशाचे झालेले ऐक्य, अखंडत्व आणि सुरक्षा कायम राखण्याची प्रतिज्ञा यावेळी करण्यात आली.
*पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आदरांजली:*
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांनाही विनम्र अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतीस वंदन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, अपर जिल्हाधिकारी संजय आसवले, सर्व उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
