धरती आबा जन जाती ग्राम उत्कर्ष अभियान’ व छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर संपन्न

गडचिरोली- धरती आबा जन जाती ग्राम उत्कर्ष अभियान’ व छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर महाराजस्व अभियान अंतर्गत 19 जुन रोजी मौजा चांदाळा समाविष्ट गावे रानमुल, माडेमुल, कुंभी मोकासा येथे विशेष जागरूकता आणि सुविधा शिबिर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्धाटक मा.खासदार श्री नामदेव किरसान गडचिरोली – चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्र यांचे हस्ते करण्यात आले. आयोजीत अभियान कार्यक्रमास तहसिलदार गडचिरोली श्री संतोष आष्टीकर, श्री सचिन नाईक,संपर्क प्रमूख, श्री महेंद्र ब्राम्हणवाडे,जिल्हाध्यक्ष कॉग्रेस पार्टी, परिविक्षा तहसिलदार श्री शशिकांत जाधव, गट विकास अधिकारी श्री अनिकेत पाटील, नायब तहसिलदार चंदु प्रधान, शाहिद शेख, श्री करेवार वैदयकिय अधिकारी चांदाळा, व इतर सर्व तालुका कार्यालयाचे प्रमूख उपस्थित होते.
हा उपक्रम अशा गावांना लक्ष्य करतो जिथे अनुसूचित जमाती (ST) ची लोकसंख्या ५०% पेक्षा जास्त आहे, ज्याचा उद्देश आदिवासी समुदायांना विविध सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सक्षम करणे आहे.
या मोहिमेचा उद्देश केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या योजनांबाबत आवश्यक कागदपत्रे तयार करणे आणि जागरूकता निर्माण करणे आहे. या मोहिमेदरम्यान सुमारे २५ प्रमुख कल्याणकारी योजना राबविण्यासाठी तालुक्यातील विभाग सहकार्य करीत आहेत. कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी आणि सेवा प्रभावीपणे पुरवण्यासाठी तालुका पातळीवर तहसिलदार यांची नियुक्ती केली आहे.
या शिबिरांमध्ये आधार नोंदणी, जन धन बँक खाते उघडणे, किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), आयुष्मान भारत आरोग्य कार्ड (ABHA), क्षयरोग मुक्त भारत उपक्रमांतर्गत सिकलसेल अॅनिमिया आणि क्षयरोगाची तपासणी आणि जागरूकता, लसीकरण, अधिवास, जात आणि उत्पन्न प्रमाणपत्रे, मनरेगा जॉब कार्ड, सामाजिक सुरक्षा पेन्शन (वृद्धापकाळ, विधवा, अपंगत्व), पंतप्रधान विश्वकर्मा, मुद्रा कर्ज आणि मनरेगा यासह उपजीविका योजना, महिला आणि बाल कल्याण कार्यक्रम जसे की पंतप्रधान मातृ वंदना योजना आणि आयसीडीएस सेवा आणि लसीकरण रेकॉर्ड अपडेट करणे यासारख्या विविध योजना आणि सेवांचा लाभ शिबीराचे माध्यमातुन देण्यात आले. यावेळी विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले. याचा नागरिकांनी पुरेपुर लाभ घेतलेला आहे.
कार्यक्रमाची प्रस्तावना चंदु प्रधान, नायब तहसिलदार यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजक तालुका प्रशासन गडचिरोली, सुरेश बांबोळे तंटामुक्ती अध्यक्ष, पाल प्रशासक ग्रा.पं.चांदाळा ताराम केंद्रप्रमुख,गुरवळा, मुळे मुख्याध्यापक वि.दा.सावरकर आश्रम शाळा चांदाळा, मंडळ अधिकारी व सर्कलमधील सर्व ग्रा.म.अ., महसूल सेवक यांनी कार्यक्रमास सहकार्य केले. कार्यक्रमास गाव व परिसरातील बहुसंख्य नागरीक उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार संजय मडावी जि.प. शिक्षक यांनी केले.