दि. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती घोटाळा प्रकरण…
पदभरती प्रकरणातील अन्यायग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालय समोरबेमुदत साखळी उपोषण सुरू

जिल्ह्याचे सह पालकमंत्री आशिष जयस्वाल यांची भेट व अन्यायग्रस्तांशी चर्चा..
गडचिरोली :- दिनांक 15 / 5 / 2025 पासून दि.गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुशिक्षित युवा – युवती नोकर भरती संघर्ष समिती गडचिरोली यांच्या वतीने बेमुदत साखळी उपोषणाची सुरुवात करण्यात आली असून या उपोषणाला जिल्ह्याचे सह पालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी भेट दिलेली असून संबंधित अन्यायग्रस्त उपोषणकर्ते यांच्याशी चर्चा केली. यावेळी उपोषण करणाऱ्यांनी आमच्या मागण्याची पूर्तता करावी अशी विनवणी सह पालकमंत्री यांच्याकडे केलेली आहे.
दि. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. गडचिरोली यांनी कृती समितीच्या मागण्या मंजूर न केल्यास बेमुदत साखळी उपोषण करण्याबाबत सूचना केली होती त्या अनुषंगाने दिनांक 15 मे 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोलीच्या समोर साखळी उपोषणाला सुरुवात केली असून त्यांनी आपल्या मागण्या खालील प्रमाणे पूर्ण करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
1) दि. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. गडचिरोली यांच्या मार्फतीने दिलेल्या नियुक्त आदेशाप्रमाणे अंमलबजावणी करून त्वरित कामावर रुजू करणे बाबत.
2) आस्थापनेत कार्यरत असताना मयत व गंभीर आजाराने पिढीत असलेल्या कर्मचाऱ्यांचे वारसांना अनुकंपा तत्त्वावर त्वरित सेवेत सामावून घेण्याबाबत.
3) बँकेत पदाचा गैरवापर व मनमानी कारभार करणाऱ्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषीवर कारवाई करणे बाबत.
सदर मागण्यांची पूर्तता करण्यासाठी दिनांक 16 /4 / 2025 रोजी दि. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुशिक्षित युवा – युवती नोकर भरती संघर्ष कृती समिती गडचिरोली द्वारे बँकेचे अध्यक्ष जेष्ठ संचालक माननीय अरविंद सावकार पोरेड्डीवार व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वरील मागण्याबाबत चर्चा करून विनंती करण्यात आली परंतु चर्चेमध्ये कोणताही तोडगा काढण्यात आला नाही.
त्यामुळे अन्यायग्रस्त सुशिक्षित युवा – युवती नोकर भरती संघर्ष कृती समिती गडचिरोली यांनी साखळी उपोषणाचा हत्यार उपसले असून जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या कार्यालया समोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केलेला आहे.
दि. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये लिपिक, शिपाई, व इतर कर्मचाऱ्यांचे अप्रत्यक्षरीत्या भरती घेण्यात येत आहे अशी माहिती भाग्यवान टेकाम यांना देऊन भाग्यवान टेकाम यांनी सुशिक्षित युवा – युवती व पालक यांना शोधण्याचे काम सुरू केले. व भाग्यवान टेकाम यांच्या भूलथापांना बळी पडून युवा – युवती व पालक यांनी भाग्यवान टेकाम यांच्याशी संपर्क साधून आपले शैक्षणिक कागदपत्रे जमा करून पदानुसार आर्थिक व्यवहार केला. त्याचप्रमाणे बँकेचे अध्यक्ष व जेष्ठ संचालक अरविंद सावकार पोरेड्डीवार व त्यांचे विश्वासू सहाय्यक सचिव गुणवंत दहीकर यांनी स्वतःचे हस्तलिखित साक्षरात नियुक्तीचे आदेश भाग्यवान टेकाम यांच्याकडे देऊन त्यांनी युवा युवतीकडे सदर आदेश पोहोचवण्याचे काम केले.
सदर आदेश घेऊन भाग्यवान टेकाम यांना घेऊन युवा – युवतींनी सहाय्यक सचिवांशी संपर्क केला व आदेशाप्रमाणे सेवेत रुजू करण्याबाबत विचारणा केली तेव्हा बँकेचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जेष्ठ संचालक अरविंद सावकार हे ज्या दिवशी तुम्हाला सांगतील त्या दिवशी तुम्ही नियुक्ती आदेश प्रमाणे शाखेमध्ये रुजू होण्यास यावे असे सांगितले. त्यांचे सांगितल्याप्रमाणे युवा युवती प्रत्येक महिन्याला विचारणा करीत होते. परंतु 15 – 15 दिवसाच्या अंतराने तारकावर तारखा देण्यात आले. त्यानंतर बँकेचे अध्यक्ष जेष्ठ संचालक अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी गुणवंत दहीकर यांचे माध्यमातून फोन करून सांगितले की सदर आदेश देऊन शाखेमध्ये रुजू होण्यास जावे असे सांगितले. त्यामुळे अनेक युवा युती शाखेमध्ये रुजू होण्यास नियुक्ती आदेश घेऊन गेले असता बँकेच्या शाखेचे व्यवस्थापकांनी जीवायुती यांना कामावरून रजू करून घेतले नाही त्यामुळे युवायतीने सदर नियुक्ती आदेश देऊन बँकेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे गेले असता सदर आदेश खोटा व बनावटी असल्याचे सांगितले. व माजी साक्षरी खोटी आहे तुम्ही जेष्ठ संचालक श्री अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्याकडे जाण्यास सांगितले.
सदर पदभरतीत आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यामुळे दि.15 पासून गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुशिक्षित युवा युवती नोकर भरती संघर्ष कृती समिती गडचिरोली यांच्यावतीने हे बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.