ताज्या घडामोडी

*दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार ‘गडचिरोलीसाठी’ महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

*पहिल्या दिवशी 6,25,457 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार*

गडचिरोली दि.22 : दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यात गुंतवणूकिचा पहिला करार गडचिरोलीसाठी करण्यात आला. कल्याणी समूहासोबत संरक्षण, स्टील, ईव्ही क्षेत्रासाठी हा करार झाला. यात गुंतवणूक 5200 कोटी रुपयांची असून 4000 रोजगार निर्मिती होणार आहे.
यासोबतच गडचिरोली आणि नागपूर भागात स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स इत्यादी क्षेत्रात कार्यरत जेएसडब्ल्यू या कंपनीसोबत 3 लाख कोटींचा सामंज्यस्य करार करण्यात आला आहे. यातून 10 हजार रोजगार उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. पहिल्या दिवशी करण्यात आलेल्या गुंतवणूक करार मध्ये हा सर्वाधिक रकम गुंतवणूकीचा करार आहे.
गडचिरोली हा राज्यातील शेवटचा नाही तर पहिला जिल्हा असल्याचे मुख्यमंत्री यांनी नुकतेच गडचिरोलीत सांगितले होते. त्‍यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रासाठी पहिल्या दिवशी ऐतिहासिक 6,25,457 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाले. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे, हा एक नवा विक्रम आहे. महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट देणारा हा करार असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
पहिल्या दिवशी झालेले सामंजस्य करार हे कल्याणी समूह, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, बालासोर अलॉय लि., विराज प्रोफाईल्स प्रा. लि., एबी इनबेव, जेएसडब्ल्यू, वारी एनर्जी, टेम्बो, एलमाँट, ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी, अवनी पॉवर बॅटरिज, जेन्सॉल, बिसलरी इंटरनॅशनल, एच टू पॉवर, झेड आर टू, ब्ल्यू एनर्जी मोटर्स, इस्सार, बुक माय शो, वेल्स्पून इत्यादी कंपन्यांचा समावेश असून, लॉजिस्टिक, ऑटोमोबाईल्स, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, पायाभूत सुविधा, करमणूक, हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आदी क्षेत्रातील हे करार आहेत. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत.
000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button