ताज्या घडामोडी

*बियाणे-खते-कीटकनाशक संबंधित अडचणी सोडवण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन*

 

गडचिरोली,दि.10 (जिमाका): बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करते वेळेस शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
नियंत्रण कक्षात शेतकऱ्यांच्या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकिंग बाबत असलेल्या प्रत्येक तक्रारींचे निवारण होईल. नियंत्रण कक्ष १५ मे ते २५ ऑगस्ट या दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ७.०० या वेळेत सुरु राहील. जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात तसेच तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांना तक्रार नोंदविता येईल.
तसेच बोगस खते बियाणे विक्री होत असल्यास नजीकच्या तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.

नियंत्रण कक्षात तक्रारीकरीता ९४०४५३५४८१ या क्रमांकावर व ०७१३२-२२२५९३, ०७१३२-२२२३१२ तसेच टोल फ्री क्र. १८००२३३४०० या क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येईल.

कोणत्या तक्रारी करता येणार – बोगस बियाणे, खते, कीटकनाशके, लिंकिंग, ज्यादा दराने विक्री, पक्की बिलाची पावती न देणे.

निविष्ठा खरेदी करताना शेतकऱ्यांनी काय करावे – परवाना धारक विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावे,पक्के बिल घ्यावे, बिलावर दुकानाचे नाव, लॉट नंबर, खरेदी दाराचे नाव, विक्रीची किंमत, अंतिम मुदत असल्याची खात्री करूनच घ्यावी, पावतीवर शेतकऱ्याची सही व अंगठा तसेच विक्रेत्याची सही व शिक्का असावा, कच्चे बिल स्विकारू नये पक्क्या बिलाचा आग्रह करावा, हंगाम संपेपर्यंत बिल जपुन ठेवावे, पेरणीसाठी पिशवी फोडताना खालील बाजूने फोडावी, व पिशवीला असलेले टॅग व लेबल जपून ठेवावा.

काय करू नये- फेरीवाले, विक्रते (घरपोच सेवा देणारे ) यांच्याकडून बी-बियाणे, खते व कीटकनाशक यांची खरेदी करू नये, कोणत्याही परिस्थितीत छापील किमतीपेक्षा अधिक दराने बियाणे, खते खरेदी करू नये, विक्रेते जबरदस्ती करत असल्यास त्वरित ८६९८३८९७७३ या व्हाटसप क्र. वर तक्रार करावी. असे आवाहन जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम यांनी केले आहे.
0000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button