*जप्त व बेवारस वाहनांचा १२ एप्रिल रोजी लिलाव*
गडचिरोली (जिमाका), दि. 09 – देसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेली तसेच अनेक वर्षांपासून पोलीस ठाण्यात बेवारस अवस्थेत उभी असलेल्या वाहनांचा १२ एप्रिल २०२५ रोजी देसाईगंज येथे कायदेशीर लिलाव करण्यात येणार आहे.
देसाईगंज पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेली २९ दुचाकी, ८ चारचाकी वाहने, तसेच बेवारस स्थितीत आढळून आलेली ७७ दुचाकी आणि १५ चारचाकी वाहने अशी एकूण १२९ वाहने उभी आहेत. या सर्व वाहनांचा मूळ मालक शोधूनही न सापडल्याने संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून कायदेशीर लिलावाची मागणी करण्यात आली होती.
या लिलावामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी संबंधित पोलीस ठाण्यात अथवा उपविभागीय अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन देसाइगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी केले आहे.