ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर; PM मोदींची घोषणा

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची घोषणा केली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर भाजपमधील दुसरे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना हा पुरस्कार देण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या जडण- घडणीत लालकृष्ण अडवाणींचे मोठे योगदान आहे. पंतप्रधान मोदींनी घोषणा केल्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी सोशल मीडियावरुन अडवाणींना शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (Lalkrishna Advani) यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी याबाबतची घोषणा केली. तसेच लालकृष्ण अडवाणी यांचे फोन करुन अभिनंदनही केले. या घोषणेनंतर सोशल मीडियावरुन अनेकांनी लालकृष्ण अडवाणी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट..
“श्री लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. मी त्यांच्याशीही बोललो आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक, भारताच्या विकासात त्यांचे योगदान अतुलनीय आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणालेत.