ताज्या घडामोडी

*गडचिरोलीच्या विकासासाठी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातील घोषणांचे लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडकडून स्वागत*

गडचिरोली, दि. १० : महाराष्ट्र शासनाच्या ₹500 कोटींच्या खनन कॉरिडॉर प्रकल्प आणि गडचिरोलीला ‘स्टील हब’ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टिकोनाचे मनःपूर्वक स्वागत असून या महत्वाकांक्षी उपक्रमामुळे जिल्ह्यात औद्योगिक वाढ, रोजगार निर्मिती आणि सामाजिक-आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया येथील लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड चे निवासी संचालक विक्रम मेहता यांनी दिली आहे.

दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये ₹21,830 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार जाहीर करण्यात आले, ज्यामुळे 7,500 नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या विकास प्रक्रियेत लॉईड्स मेटल्स महत्त्वाची भूमिका बजावत असून, टिकाऊ खनन पद्धती, कौशल्य विकास कार्यक्रम आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला पाठिंबा देण्यास वचनबद्ध आहे.

याशिवाय, अरमोरी येथे प्रस्तावित रेशीम कोष बाजारपेठेच्या स्थापनेचेही लॉईड्स मेटल्स स्वागत करते. यामुळे स्थानिक शेतकरी व कष्टकरी वर्गाला आर्थिक बळकटी मिळेल आणि जिल्ह्याच्या आर्थिक स्थैर्यात मोठी वाढ होईल.

लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे निवासी संचालक श्री. विक्रम मेहता यांनी सांगितले की,
“गडचिरोलीच्या औद्योगिक आणि सामाजिक विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयांचे आम्ही उत्स्फूर्त स्वागत करतो. शासन आणि स्थानिक भागधारकांसोबत सहकार्य करून, आम्ही या परिवर्तनाचा सक्रिय भागीदार राहू. हा प्रकल्प केवळ उद्योगांसाठीच नव्हे, तर स्थानिक समुदायाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल.”

गडचिरोलीच्या दीर्घकालीन समृद्धीसाठी लाॅईड्स मेटल शासनासोबत सहकार्य करण्यास पूर्णतः कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया श्री मेहता यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button