ताज्या घडामोडी
*राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर*
गडचिरोली, दि. २७ : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आणि कर्मचारी गडचिरोली येथे २८ फेब्रुवारी रोजी दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वा. विश्रामगृह येथे आगमन. स. 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा जात पडताळणी समिती अध्यक्ष व प्रांताधिकारी यांच्यासोबत बैठक, सकाळी 11.30 वाजता उपसमितीमार्फत माना, झाडे, राजपुत, आर्य वैश्य कोमटी, गोलकर या जाती समूहाची क्षेत्रपाहणी. सायंकाळी ४ वाजता चंद्रपूरकडे रवाना.
००००००