*विश्वविख्यात क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे लॉयड्स मेटल्सच्या क्रिकेट सामन्यांचे उदघाटन* *

*एम.डी प्रभाकरन यांचे सह माजी आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांची उपस्थिती*
*मोठ्या संख्येने येऊन प्रेक्षकांनी जीडीपीएल क्रिकेट सामन्यांचा आनंद घ्यावा डॉक्टर देवराव होळी यांचे आवाहन*
*दिनांक ५ फेब्रुवारी गडचिरोली*
*लॉयड्स मेटल्स कंपनीच्या वतीने गडचिरोली एमआयडीसी परिसरात गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग (GDPL -2025)भव्य दिव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून या क्रिकेट सामन्याच्या उद्घाटनाला विश्वविख्यात क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी हजेरी लावली या भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्याला लॉयड्स मेटल्स चे एम.डी. प्रभाकरण, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉक्टर देवरावजी होळी यांचे सह दिग्गज मान्यवर उपस्थित होते.*
*गडचिरोली सारख्या अतिदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन भूतकाळात कधी झालेले नाही. असे आयोजन केल्याबद्दल माजी आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी लॉयड्स मेटल्सचे अभिनंदन केले आहे. यातून जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंना भविष्यात मोठ्या संधी चालून येणार आहेत. 28 फेब्रुवारी पर्यंत या क्रिकेट सामन्यांचा आनंद जिल्हा वासियांना घेता येणार आहे. त्यामुळे जिल्हा वासियांनी मोठ्या संख्येने या सामन्यांचा आनंद घ्यावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले आहे.*