रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज . प्रा. मुनिश्वर बोरकर

रिपब्लीकन चळवळीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी साबुत ठेवणे काळाची गरज आहे. यापूर्वी रिपाईचा दबदबा होता आताच्या रिपब्लिकन चळवळीच्या अनेक पार्ट्यामुळे रिपाई नष्ठ होणार काय ? अशी भिती वाटू लागली आहे. रिपाईला संपविण्याचे काम भाजप कांग्रेसवाले करीत आहेत. ते एकाच माळेचे मणी आहेत .तेव्हा आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टीला बळ देऊन रिपाई मजबुत करण्याचा प्रयत्न करू या तेव्हा तमाम आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्तांनी एकजुटीने रिपब्लिकन पक्ष बाचविणे काळाची गरज आहे असे आपल्या मार्गदर्शनात प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी सांगीतले . रिपाई मेळाव्याचे अध्यक्ष मुरलीधर भानारकर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन रिपाई नेते प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली रिपाई जिल्हाध्यक्ष चंद्रपूर गोपाल रायपूरे , नासीर ज्जुमन शेख , पक्ष प्रवक्ता अशोक शामकुळे , रिपाई महिला आघाडीच्या नेत्या अँड. प्रियंका चव्हाण ,उपाध्यक्ष सोनू साखरे ,महासचिव परशराम बांबोळे , उपाध्यक्ष मारोती भैसारे ‘ कुरखेडा तालुकाध्यक्ष सुनिल सहारे, मोहनदास मेश्राम ,सचिन किरणापूरे , टि. एम . खोब्रागडे,आरमोरी तालुकाध्यक्ष राजेंद्र ठवरे ‘ देवेंद्र बोदेले ‘ शामराव सहारे ,गडचिरोली तालुकाध्यक्ष जिवन मेश्राम ‘ आदिची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे संचलन विजय शेंन्डे तर आभार शामराव सहारे यांनी मानले. कार्यक्रमास प्रशांत मेश्राम ‘ हर्ष साखरे , दिनेश वनकर ‘ युवराज धंदरे ‘ विलास सेलोटे , किशोर टिचकुले ‘ सचिन किरणापूरे ‘ बाळू ढेभुर्ण , केदार रामटेके , राजाराम लोखंडे , अशोक बावणे , जर्नाधन राऊत , भावेश बोरकर , हेमंत डोंगरे , मनोहर अंबादे ‘ सारंग नागरे ‘ आदि सहीत आरमोरी तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.