*मार्कंडेय जयंतीनिमित्त शोभायात्रा व विविध कार्यक्रमाचे आयोजन*

गडचिरोली दि. १- पद्मशाली समाजाचे आद्यदैवत महर्षी श्री मार्कंडेय महामुनी यांची आज जयंती संपुर्ण देशभर साजरी करण्यात येत आहे. नगर पद्मशाली समाज गडचिरोली तर्फे मार्कंडेय जयंतीनिमित्त शोभायात्रा व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री मार्कंडेय मंदिर पोलीस स्टेशनच्या मागे गडचिरोली येथे आज सकाळी ९-०० वाजता मार्कंडेय महामुनींची पुजा व आरती, दुपारी १२-०० वाजता महीलांचा हळदी कुंकू व वाण कार्यक्रम, दुपारी ३-०० वाजता गडचिरोली शहरातून कलश शोभायात्रा व मार्कंडेय प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येईल.
सायंकाळी ५-०० पासून महाप्रसाद (सहभोजन).
मार्कंडेय जयंती कार्यक्रमाला सर्व पद्मशाली समाज बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन नगर पद्मशाली समाजाचे अध्यक्ष अशोक कोंडलेकर, उपाध्यक्ष अशोक रच्चावार, सचिव अमोल आकनुरवार, कोषाध्यक्ष स्वप्नील अडेटवार,सहसचिव अमित बिट्टूरवार तथा महीला अध्यक्ष सौ. रोहीणी पद्मशाली, उपाध्यक्ष सौ. स्मिता कोंडलेकर, सचीव सौ.स्वाती आकनुरवार, कोषाध्यक्ष सौ.वैशाली वासलवार
यांनी केले आहे.