ताज्या घडामोडी
दैनिक ‘आदिवासी माणूस’ च्या प्रकाशनाला आज ३८ वर्षे पुर्ण : ३९ व्या वर्षात पदार्पण
दि.२१ आॕक्टोंबर १९८३ रोजी दैनिक आदिवासी माणूस या मराठी वृत्तपत्राचे गडचिरोली येथे प्रकाशन करण्यात आले.
२६ आॕगष्ट १९८२ रोजी चन्द्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून नविन गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. यावेळी गडचिरोली जिल्ह्यात एकही दैनिक वृत्तपत्र नव्हते.
२१ आॕक्टोंबर १९८३ ला सुरू झालेल्या या दैनिकास आज ३८ वर्षे पुर्ण झालीत. सुरूवातीपासून छपाई करून प्रकाशित होणारे दैनिक आता न्युज पोर्टल स्वरूपात प्रकाशित होत आहे. या स्पर्धेच्या जगात आमचे वृत्तपत्र सुरू आहे.
गेल्या ३८ वर्षात वाचकांनी, जाहिरातदारांनी व शुभचिंतकांनी जे सहकार्य दिले, त्याबद्दल धन्यवाद !
-सुरेश पद्मशाली