*गडचिरोली प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी गठीत*
*अध्यक्षपदी मनोज ताजने तर सचिवपदी मिलिंद उमरे यांची निवड*

गडचिरोली, दि.25 : जिल्ह्यातील पत्रकारांची अग्रगण्य संघटना असलेल्या गडचिरोली प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यात अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने यांची, तर सचिवपदी दैनिक सकाळचे जिल्हा प्रतिनिधी मिलिंद उमरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
प्रेस क्लबची वार्षिक बैठक स्थानिक प्रेस क्लब भवन येथे पार पडली. या बैठकीत निवडलेल्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदावर दैनिक देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी अनिल धामाेडे, कोषाध्यक्षपदी तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर काथवटे, सहसचिवपदी लोकशाही वार्ताचे जिल्हा प्रतिनिधी नीलेश पटले यांची निवड करण्यात आली. सदस्यांमध्ये दैनिक हितवादचे जिल्हा प्रतिनिधी रोहिदास राऊत, ज्येष्ठ पत्रकार दैनिक आदिवासी माणूस चे संपादक सुरेश पद्मशाली, पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी अविनाश भांडेकर, नवराष्ट्रचे जिल्हा प्रतिनिधी अरविंदकुमार खोब्रागडे, भास्करचे जिल्हा प्रतिनिधी रुपराज वाकोडे, नवभारतचे जिल्हा प्रतिनिधी सुरेश नगराळे, युवाराष्ट्र दर्शनचे शेमदेव चाफले, गडचिरोली पत्रिकाचे संपादक विलास दशमुखे यांचा समावेश आहे.
————————-