ताज्या घडामोडी

*”हिवताप नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून युद्धपातळीवर उपाययोजना”*

 

*आयुषी सिंह यांच्या संकल्पनेतून *टार्गेट मलेरिया विशेष मोहीम*

गडचिरोली 12 :- जिल्ह्यातील वाढती हिवताप रुग्ण संख्या लक्षात घेता आरोग्य विभाग जिल्हा परिषद गडचिरोली , जिल्हा हिवताप विभाग कडून सर्व विभागाच्या समन्वयाने विविध उपाययोजना युद्धपातळीवर केल्या जात आहेत.
यामध्ये हिवताप प्रवण क्षेत्र असलेल्या 2,70203 लोकसंख्या मधील 658 गावात प्रथम फेरीत किटकनाशक फवारणी केली जात आहे. 76306 लोकसंख्या असलेल्या 257 गावात फवारणी पूर्ण झाली असून उर्वरित 401 गावात युद्धपातळीवर किटकनाशक फवारणी चालू आहे, व 16 ऑगस्ट पासून पुन्हा याच 658 गावांमध्ये दुसऱ्या फेरीत किटकनाशक फवारणी केली जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांनी सांगितले आहे.

जिल्ह्यात हिवताप रक्त तपासणी लवकरात लवकर होणेसाठी नागपूर मंडळातून इतर जिल्ह्यातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांची विशेष नियुक्ती या मोहिमेसाठी केली आहे तसेच 140 क्षेत्रीय कर्माचारी यांचे मार्फत गावोगावी हिवताप सर्वेक्षण केले जात आहे. तसेच हिवताप उपचार, मच्छरदानी वापराविषयीं , परिसर स्वच्छतेविषयी आरोग्य शिक्षण देऊन जनजागृती केली जात आहे.

मुख्य कार्यकारी आयुषी सिंह यांच्या संकल्पनेतून *टार्गेट मलेरिया* 2024 ही विशेष मोहीम जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून 1 एप्रिल 2024 पासून राबवली जात आहे. यामध्ये 6 तालुक्यातील 16 प्राथमिक आरोग्य केंद्रातील अतिसंवेदनशील 722 गावे निवडण्यात आली आहेत.या गावातील 2,72,066 लोकसंख्येला आशा व आरोग्य कर्माचारी प्रत्यक्ष भेट देऊन व रक्तनमुने घेऊन निदान व औषधोपचार करत आहेत. *टार्गेट मलेरिया* 2024 अंतर्गत 16 प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रथम फेरी मध्ये (दि 1/04/2023 ते दि 31/05/24) 2,72066 लोकसंख्येपैकी 2,62,598 लोकसंख्येची तपासणी पूर्ण झाली असून यामध्ये 2,81,223 इतक्या हिवताप चाचण्या करण्यात आल्या यामध्ये PV -84 PF -187 प्रकारचे रुग्ण हिवताप दूषित आढळून आले. तसेच दुसऱ्या फेरीत (दि 1/06/2023 ते दि 11/07/24) अखेर 1,53,902 चाचण्या करण्यात आल्या यामध्ये PV -94 PF -330 प्रकारचे असे एकूण 424 दूषित रुग्ण आढळून आले. हिवताप दूषित रुग्णांना तात्काळ योग्य उपचार आरोग्य कर्मच्याऱ्यांच्या देखरेखी खाली चालू केले जात आहेत. उपचार पूर्ण होईपर्यत पाठपुरावा देखील केला जात असल्याचे डॉ पंकज हेमके जिल्हा हिवताप अधिकारी यांनी कळवले आहे.
000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button