आरोग्यासाठी वरदान : गुळवेल

आयुर्वेदात अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या आरोग्यासाठी वरदान मानल्या जातात. गिलॉय अर्थात गुळवेलीचा देखील यात समावेश होतो. गिलॉय, टिनोस्पोरिन, टिनोस्पोरिक अॅसिड, लोह, पाल्मेरियन, फॉस्फरस, तांबे, कॅल्शियम आणि झिंक इत्यादी पोषक घटक गुळवेलीमध्ये आढळतात.
गुळवेलीमध्ये आढळणारे हे घटक स्वाईन फ्लू, डेंग्यू आणि मलेरिया यासारख्या गंभीर आजारांना प्रतिबंध करतात. इतकंच नाही तर, आरोग्यासाठी देखील त्याचे अनेक फायदे आहेत. आयुर्वेदानुसार गुळवेलीची मुळे, देठ आणि पाने आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. गिलॉय अर्थात गुळवेलच्या नियमित सेवनाने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. चला जाणून घेऊया गिलॉयचे फायदे
गिलॉय अर्थात गुळवेलचे फायदे
सांधेदुखी
जे लोक सांधेदुखीच्या समस्येने त्रस्त आहेत, त्यांनी त्यांच्या रोजच्या आहारात गिलॉयचा समावेश करावा. यासाठी गिलॉयच्या काड्याची पावडर करून दुधात उकळा आणि हे दूध रोज प्या. हे दूध प्यायल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. ज्यांना सांधेदुखीपासून आराम मिळवायचा आहे, ते आल्यासोबत मिसळून देखील गिलॉयचे सेवन करू शकतात.
रक्त शुद्ध करते
गिलॉयच्या देठांना पाण्यात उकळून गाळून हे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि त्या व्यक्तीचे रक्त स्वच्छ राहते. एवढेच नाही तर, गिलॉयचा काढा त्वचेचे आजार आणि ऍलर्जी टाळू शकतो. यामुळे रक्त विकार आणि त्वचारोग बरे होतात.
प्रतिकारशक्ती
बऱ्याच रोगांपासून संरक्षण करण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. गिलॉय रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रभावी मानले गेले आहे. गिलॉय ज्यूसचे नियमित सेवन केल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे सर्दी आणि खोकल्यासह संसर्गजन्य रोगांपासून शरीराचे संरक्षण होते.
त्वचेचे आरोग्य सुधारते
गिलॉयमध्ये असलेले अँटिइंफ्लेमेटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचेचे आरोग्य सुधारू शकतात. यामुळे मुरुम, डाग आणि त्वचेच्या इतर समस्या देखील कमी होऊ शकतात. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म वृद्धत्वाचा प्रभाव कमी करण्यास देखील मदत करतात.
मधुमेह
गिलॉय टाईप २ मधुमेह नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते. गिलॉय इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करते. गिलॉय ज्यूस प्यायल्याने रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात ठेवता येते.
डेंग्यू
डेंग्यूमुळे रुग्णाला खूप ताप येतो. गिलॉयमध्ये असलेले अँटीपायरेटिक गुणधर्म ताप लवकर बरा होण्यास मदत करून, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात