शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी

निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी हे नवं निवडणूक चिन्ह दिले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने मोठ्या घडामोडी घडत आहेत. दरम्यान महाराष्ट्र विधानसभा आणि निवडणूक आयोगाने अजित पवार यांना राष्ट्रवादीचे खरे दावेदार म्हणून स्वीकारले होते. यानंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील शाब्दिक युद्ध तीव्र झाले. दरम्यान, आता शरद पवार यांच्या समर्थकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. शरद पवार यांच्या पक्षाला आता नवे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. या पक्षाचे नाव ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ म्हणजेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असे असेल आणि निवडणूक चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे.
शरद पवार यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाकडून चिन्ह मिळाले आहे. नवीन निवडणूक चिन्हाचा संदर्भ देत पक्षाने सांगितले की, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर ही माहिती देण्यात आली आहे. तसंच चिन्ह मिळाल्यानंतर प्रतिक्रिया मांडली आहे. याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.