ताज्या घडामोडी

राम आग नव्हे ऊर्जा, वाद नव्हे उत्तर, काही लोकांनी आता विचार बदलायला हवा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

अयोध्येत श्री राम मंदिरात रामल्लाची प्रतिष्ठापना झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा नयनरम्य सोहळा झाला. या सोहळ्यात भाषण करताना पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. आजचा क्षण भारतीय समाजाच्या परिपक्वतेचा बोध आहे. आजचा क्षण विजयाचा नाही तर विनयाचाही आहे. अनेक राष्ट्र इतिहासात गुरफुटून जातात. त्यांनी इतिहास उलगडताना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यातून अडचणी आल्या. पण आपण इतिहासाची ही गाठ अत्यंत भावूकतेने सोडली आहे. आपलं भविष्य आपल्या भूतकाळापेक्षा अधिक सुंदर होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

राम आग नव्हे ऊर्जा आहेत…

राम मंदिर बनले तर आग लागेल असं काही लोक म्हणत होते. पण या लोकांना भारताच्या सामाजिक भावाची पवित्रता माहीतच नव्हती. रामलल्लाच्या मंदिराची निर्मिती सदभाव, समन्वयाचं प्रतीक आहे. भारतीय समाजाची एकरुपता आहे. हे नवनिर्माण आगीला नव्हे तर ऊर्जेला जन्म देत आहे, हे आपण पाहत आहोत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. हा क्षण भारतीय समाजाला उज्ज्वल भवितव्याकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. राम मंदिरानंतर आग लागेल असे म्हणणाऱ्या त्या लोकांना मी आवाहन करतो, या पुनर्विचार करा. राम आग नाही, राम ऊर्जा आहे. राम वाद नाही, समाधान आहे. राम फक्त आपले नाहीत, ते सर्वांचे आहे. राम फक्त वर्तमान नाही, राम अनंत काल आहेत असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button