ताज्या घडामोडी

*बी. प्रभाकरन मुळे गडचिरोली जिल्हयाच्या औद्योगिक क्रांतीला सुरूवात*

गडचिरोली जिल्हा खनिजसंपत्ती ने संपन्न आहे. या जिल्हयात सुरजागड, फुसेर व इतर काही ठिकाणी लोहखनिज आहे तर काही ठिकाणी चुनखडी व हिरे ही आहेत. २६ आॕगष्ट १९८२ रोजी चन्द्रपूर जिल्हयाचे विभाजन होऊन नवीन गडचिरोली जिल्हा निर्माण झाला तेंव्हा गडचिरोली जिल्हयाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल व गडचिरोली जिल्हा इतर जिल्हयाच्या बरोबरीत येईल असे स्वप्न जिल्हावासीयांनी बघीतले होते परंतु त्यांचा भ्रमनिराश झाला. गडचिरोली जिल्हा निर्मितीच्या ४० वर्षानंतरही गडचिरोली जिल्हयात एकही मोठा उद्योग आला नाही. परंतु प्रभाकरन यांनी जिल्हा वासीयांचे औद्योगिक क्रांती चे स्वप्न पुर्ण केले.

*बालसुब्रमन्यम प्रभाकरन*

श्री बी. प्रभाकरन यांनी नक्षलवाद्यांचा विरोध झुगारून सुरजागड येथे लोहखनिजांचे उत्खनन सुरू केले व कोनसरी येथे पोलाद प्रकल्प उभारून ख-या अर्थाने गडचिरोली जिल्हयाच्या औद्योगिक क्रांतीला सुरूवात केली आहे. गडचिरोली प्रेस क्लब तर्फे आज ६ जानेवारी २०२४ ला प्रभाकरन यांना दिला गडचिरोली गौरव पुरस्कार हा गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचा ही गौरव वाढविणारा आहे.

खनिजसंपत्ती : गडचिरोली जिल्हयात नैसर्गिकरीत्या निर्माण झालेली विपुल खनिजसंपत्ती आहे. परंतु त्याचे उत्खनन न झाल्याने ती सुरक्षीत राहीली. सुरजागड पहाडीवर लोहखनिजांचे सुमारे १४ ते २० कोटी टन साठे आहेत. अनेक वर्षापुर्वी टाटा कंपनीने या ठिकाणी पोलाद प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. काही वर्षापुर्वी लायड्स स्टील व एनर्जी या कंपनीने सुरजागड ची लीज मिळविली परंतु नक्षलवाद्यांच्या विरोधामुळे अनेक वर्ष उत्खनन करता आले नाही काही मोठ्या अधिकाऱ्यांना व पदाधिका-यांना जीव गमवावे लागले.

*बालसुब्रमन्यम प्रभाकरन*
केरळ राज्यातील एक सामान्य आयटी इंजीनीअर ओरीसा राज्यात येऊन त्याने “त्रीवेणी अर्थमुव्हर्स प्रायव्हेट लिमीटेड नावाची कंपनी स्थापन केली व फार थोड्या वेळात त्यांनी खनीज व्यवसायात नावलौकिक मिळविला. प्रभाकरन यांनी लायड्स स्टील कंपनीवर आपले प्रभुत्व मिळविले. नक्षलवाद्यांचा गड असलेल्या सुरजागड खानीतून उत्खनन सुरू करून कोनसरी येथे पोलाद प्रकल्प सुरू केला व नक्षलवाद्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. नक्षलवाद्यांच्या भितीमुळे अजूनही या जिल्हयात साधे रस्त्याचे काम करतांना लोक घाबरतात तिथे हजारो कोटींचे लोहखनिज प्रकल्प उभारणारा बी. प्रभाकरन हाच खरा क्रांतिकारक आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. बी.प्रभाकरन यांचा इतीहास फारच गौरवास्पद आहे. प्रभाकरन यांची त्रीवेणी ही कंपनी भारतातील सर्वात मोठी खान विकसत व आॕपरेटर कंपनी बनली आहे. ज्याची वार्षिक उलाढाल ३५० दशलक्ष डाॕलर आहे. ओरीसातील १५ लीज धारकांसोबत सहयोग करून प्रभाकरन ४ वर्षात भारतातील सर्वात मोठा लोहखनिज खेळाडू बनला आहे.

*गडचिरोली जिल्हयात अनेक छोटे उद्योग सुरू होऊ शकतील*
प्रभाकरन यांनी कोनसरी येथे सुरू केलेल्या पोलाद प्रकल्पावर आधारित अनेक छोटे स्टील प्लाँट अनेक तालुक्यात व गावात सुरू होऊ शकतात. यासाठी त्यांच्या ज्ञानाचा व प्रतिभेचा योग्य उपयोग करणे आवश्यक आहे. *जालना येथे ३६ स्टील प्लाँट*
जालना जिल्हयात लोहखनिज सापडत नाही तरी हे असं शहर बनलं आहे की, इथे स्टील चे जवळपास १४ मोठे प्लांट आहेत आणि २२ छोटे प्लांट आहेत. जवळपास १० ते १२ मेट्रिक टन एका दिवसाचं उत्पादन आहे. रोज ५ हजार ट्रक जालन्यातून बाहेर जातात आणि आत येतात. सगळ्या महाराष्ट्राच्या घरातून जे भंगार निघतं आणि आपण ते विकतो तिथून जालन्याच्या स्टील इंडस्ट्रीचा प्रवास सुरु होतो. हातगाडीवर जे भंगार आपण विकतो ते भंगार स्थानिक ठिकाणावरील होलसेलरला विकलं जातं. अशा वेगवेगळ्या भंगार वाल्यांकडून खरेदी झाल्यानंतर आठवडाभरात ट्रक भरून भंगार जालन्याला पाठवलं जातं.

तिथे त्या भंगाराला वितळवून कामात येईल, असं लोखंड तयार केलं जातं. फक्त महाराष्ट्राच्या नाही तर देशभरातील इतर राज्यांमधील स्क्रॅप देखील जालन्याच्या कारखान्यांत आणलं जातं आणि म्हणून जालना ‘स्टील सिटी’ म्हणून उदयास आलं आहे. *गडचिरोली स्टील सिटी होऊ शकेल* कोनसरी येथे तयार होणाऱ्या कच्च्या लोखंडावर प्रक्रिया करणारे छोटे उद्योग प्रत्येक तालुक्यात उभे राहू शकतील व गडचिरोली जिल्हयात स्टील सिटी तयार होऊ शकतील यासाठी श्री प्रभाकरन यांनी मार्गदर्शन व सहकार्य करण्याची गरज आहे.

*लोहखनिज लवकरच संपतील*

नक्षलग्रस्त भागात उद्योग उभारण्यास घाबरणारे उद्योगपती आता प्रभाकरन ची हिंमत पाहून पुढे सरसावले आहेत. जिंदाल तथा अन्य उद्योगपतींनी सुरजागड खान क्षेत्रातील खनिज ब्लाॕक मिळविले आहेत. त्यामुळे भविष्यात सुरजागड परीसरात फार मोठी उलथापालथ व संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नविन लीज मिळालेल्या उद्योगपतींनी अजूनही आपली भुमिका स्पष्ट केलेली नाही. हे उद्योगपती येथील खनिजावर आधारित उद्योग उभारण्याची शक्यता दिसत नाही कारण उद्योगासाठी लागणारी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे केवळ उत्खनन करून लोहखनिज घेऊन जाण्याचा त्यांना मानस आहे. १४ ते २० कोटी टन उपलब्ध लोहखनिज केवळ ५ ते १० वर्षात काढून नेण्यात ते यशस्वी होतील. परणामी विपुल खनिजसंपत्ती असलेला गडचिरोली जिल्हा कंगाल होईल.

*कारखाने उभारणा-यांनाच लीज द्यावी*
गडचिरोली जिल्हयात कारखाने उभारणा-यांनाच लीज द्यावी अशी आग्रहाची मागणी नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी करण्याची गरज निर्माण झाली आहे. श्री प्रभाकरन यांनी मोठ्या हिंमतीने कोनसरी प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प १०० वर्ष सुरू ठेवायचा असेल तर संपुर्ण सुरजागड चे लोहखनिज त्यासाठी आवश्यक आहे. इतर कंपन्यांना लीज देणे योग्य वाटत नाही. आज एका कंपनी ला लीज दिल्यामुळे झालेल्या उत्खननामुळे व लोहखनिजांच्या वाहतूकीमुळे या भागातील नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. उद्या सहा कंपन्यांचे उत्खनन व वाहतूक सुरू होईल तेंव्हा काय अवस्था होईल याची कल्पना न केलेलेच बरे. *सुरेश पद्मशाली*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button