ताज्या घडामोडी

चुरमुरा येथे मानव धर्म संमेलनासाठी अनुयायाची हजारोच्या संख्येने गर्दी..

 

 

फुलचंद वाघाडे / जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली..

आरमोरी :- चुरमुरा येथे मानव धर्म संमेलनासाठी अनुयायाची हजारोच्या संख्येने गर्दी
सेवकांच्या रॅलीने भक्तीमय वातावरण सामाजिक संदेशासह केली. जनजागृती व्यसनमुक्ती सामाजिक जनजागृती करिता सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराज यांच्या कार्यक्रमाचे केले होते .

आयोजन आरमोरी
तालुक्यापासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या चुरमुरा येते परमपूज्य परमात्मा एक सेवक सेवाभावी संस्था गडचिरोली यांच्या वतीने मानव धर्माचे भव्य सेवक संमेलनाचे दिनांक 25- 12 -2023 सोमवार रोजी मोठ्या उत्साहामध्ये सेवक संमेलन पार पडले. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या मानव धर्म सेवकाच्या रॅलीने चुरमुरा परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

या संमेलनातून मानव धर्म एकतेचे दर्शन घडवून दारू व्यसनापासून दूर राहा. बेटी बचाव बेटी पढाव असे अनेक घोषणा वाक्य लिहिलेले कट आउट घेऊन मोठ्या संख्येने मानवधर्माचे सेवक सहभागी झाले होते . समाजातील अंधश्रद्धा हुंडाबळी यापासून मुक्त करणारे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या शिकवणीप्रमाणे जनजागृती करण्यासाठी आरमोरी तालुक्यातील चुरमुरा येथे या सेवक संमेलनाचे आयोजन केले असल्याचे सांगण्यात आले. संमेलनाचे उद्घाटन विठ्ठलजी राऊत कोषाध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवाभावी संस्था रमेशजी वखेकर सचिव परमपूज्य परमात्मा एक सेवाभावी संस्था संजीव धकाते ज्येष्ठ सेवक परमपूज्य परमात्मा एक सेवाभावी संस्था गडचिरोली यांच्या हस्ते झाले तर संमेलनाचे अध्यक्षस्थाने डॉक्टर गोविंदरावजी दोनाडकर अध्यक्ष आयोजन नियोजन समिती गडचिरोली हे होते प्रमुख अतिथी म्हणून मोरे मॅडम जिल्हाप्रमुख शिवसेना महिला गडचिरोली आमदार कृष्णाजी गजबे आरमोरी परसरामजी टिकले माजी सभापती वडसा रामदासजी मसराम सामाजिक कार्यकर्ते शंकरपूर फाल्गुनजी मानकर मार्गदर्शक कुरखेडा हिम्मत लालजी किरमे अध्यक्ष लांजी दिवाकरजी ठेंगरे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक सेवाभावी संस्था गडचिरोली डॉक्टर तागवन साहेब आरमोरी गिरीधर जी लांजेवार गुणवंतजी फटे मार्गदर्शक विकास नगर आगाशे बयर संगीता मडावी, चंदाताई राऊत आरमोरी नकाते फुलझले, युवराज ठोंबरे रायपूर ,रोहित ठुब्रिकर नागपूर ,दिगंबर बांगडकर मौदा , कुडे सरपंच चुरमुरा झंपलवाजी पोलीस पाटील चुरमुरा प्राचार्य राजकुमारजी शेंडे चूरमुरा रवींद्र कॉमडी मार्गदर्शक चुरमुरा माणिक मानकर मार्गदर्शक दिनेशजी बनकर पत्रकार भास्करजी मानकर रामगड मानकरजी महाराष्ट्र पोलीस आरमोरी तसेच सेवाभावी संस्थेचे सर्व संचालक गण मार्गदर्शक आदी मान्यवरांची संमेलना निमित्ताने उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत ठेंगरी आरमोरी यांनी केले तर संचालन माणिक जी मेश्राम तर आभार प्रदर्शन विठ्ठलराजी राऊत यांनी मांनले संमेलनामध्ये सायंकाळच्या सात वाजे सामाजिक प्रबोधन म्हणून सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या आस्वाद घेण्याकरिता जिल्ह्यातील आणि बाहेर जिल्ह्यातील प्रेक्षक वर्गाची भरगच्च लक्षणीय उपस्थिती होती. सत्यपाल महाराज यांनी आपल्या प्रबोधनातून व्यसनमुक्ती दारूमुळे होणारा मानवी जीवनाचा विनाश स्त्रीभ्रूण हत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लीहलेल्या संविधानाचे सामाजिक महत्व महात्मा फुले
सावित्री बाई फुले यांचे समाज घडविण्यात असलेले योगदान आधी विषयावर प्रबोधन रुपी प्रकाश टाकून उपस्थित सेवक तथा परिसरातील जनतेला मोलाचा संदेश दिला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सेवकांनी व चुरमुरा येथील ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button