हिट अँड रन’ कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी वाहन चालकांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

रस्ते अपघातानंतर लोकांच्या रोषाला घाबरून पळून जाणाऱ्या जड वाहन चालकाविरुद्ध संसदेत पारित झालेल्या कठोर विधेयकाच्या निषेधार्थ ‘हिट अँड रन’ हा काळा कायदा रद्द करण्याच्या मागणी करिता मंगळवार २ जानेवारी रोजी वाहन चालकाच्या अनेक संघटनांनी एकत्र येऊन गडचिरोली शहरातील तहसील कार्यालय येथून शांततेत मोर्चा काढून जिल्हा कचेरीवर नेऊन शासनाचे लक्ष वेधले. कायदा व सुव्यवस्थेचे संपूर्ण भान ठेवून वाहन चालकांनी मोर्चा तहसील कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा पायी मोर्चा काढला.
नुकताच केंद्रातील सरकारनी अपघात झाल्यावर वाहन चालक पळुन गेल्यास १० वर्षाचा कारावास व ७ लाख रुपए दंड असा काळा कायदा अमलात आणला.त्या विरोधात गडचिरोली शहरातुन मुख्य मार्गाने केंद्र सरकारने काळा कायदा रद्द करण्याच्या घोषणा देत सरकार चा निषेध व्यक्त केला आहे. व या आंदोलनातून सरकारचे लक्ष वेधले.
अपघात हा आकस्मित नकळत होतो. अपघात झाल्यावर चालक थांबुन अपघात ग्रस्ताना दवाखान्या मध्ये घेऊन जाण्याचे प्रयत्न करताच नागरीक चालकाला मारहाण करतात व गाडी जाळपोळ करण्याच्या आजपर्यत कित्येत घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाहन चालक पळुन जातो मात्र यावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हुकुमशाही पद्धतीने काळे कायदे आणले.
त्या विरोधात स॓पुर्ण भारतात ठीक ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करत वाहन चालकाचे आंदोलन चालु आहे त्याच समर्थनार्थ आज गडचिरोली शहरात देखील मोर्चा काढून सरकारचा निषेध नोदविला.
आज झालेल्या सहभागी मोर्चात एकता चालक-मालक संघटनेचे रुपेश टिकले, महेंद्र वाघमारे,आशिष भांडेकर,अनिल कुंटावार, किरण नैताम, योगेश कन्नाके, इमरान पठाण, फहिम सय्यद, संजय नेरकर, राज दुर्योधन, करीम शेख, राहील खतीब, जमीर शेख, अमित तिवाडे यांचेसह टॅक्सी चालक-मालक संघटनाचे प्रशांत नंदनवार, रोशन नंदनवार, चंद्रशेखर डोंगरे, प्रल्हाद कुमरे, जमीर सय्यद, अमित शेख, गंगाधर शेंद्रे, उमेश राऊत तसेच ऑटो चालक-मालक संघटनेचे विविध पदाधिकारी व वाहन चालक हजर होते.