पोलीस – नक्षलवादी चकमक : १२ नक्षलवाद्यांचा खात्मा
गडचिरोली पोलिसांचे C-60 जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये काल दुपारी दीड वाजताच्या सुमारास चकमक झडली. गडचिरोली जिल्ह्यातील जारावंडी पोलीस स्टेशन अंतर्गत छिंदभट्टी आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील जंगलात ही चकमक घडली.यात १२ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर सी-६० पार्टीचे पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील यांच्या डाव्या खांद्याला गोळी लागली आहे.चकमकीत जखमी झालेल्या उपनिरीक्षक सतीश पाटील यांना घेऊन हेलिकॉप्टरने कांकेर येथून गडचिरोलीकडे आणण्यात आले. घटनास्थळी पोलिसांचे नक्षलविरोधी अभियान सुरू असून या चकमकीत काही नक्षलवादीही जखमी झाल्याची शक्यता पोलीस विभागाने वर्तवली आहे. विशेष म्हणजे, सुरजगड इस्पात या खाजगी कंपनीच्या पायाभरणीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उद्योगमंत्री उदय सामंत हे दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी याच परिसरात उपस्थित होते.