ताज्या घडामोडी

*महसूल पंधरवडानिमित्त कृषी विभागामार्फत वृक्षारोपण*

 

गडचिरोली दि.8 : महसूल पंधरवडा निमित्त कृषी विभागामार्फत विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यात 6ऑगस्ट रोजी देसाईगंज शेतकरी उत्पादक कंपनी कोंढाळा तालुका वडसा, जिल्हा गडचिरोली येथे महसूल पंधरवडा आणि रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेला 90 वर्षे पूर्ण झाले यानिमित्ताने कृषी विभाग, आत्मा व स्मार्ट मार्फत वृक्षारोपण लागवड व वित्तीय सल्ला कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी एकूण 150 फळझाडे लावण्यात आले.
सदर कार्यक्रमात आमदार कृष्णाजी गजबे, सुनील पारधी अध्यक्ष देसाईगंज शेतकरी उत्पादक कंपनी कोंढाळा यांच्या अध्यक्षतेखाली प्रज्ञा गोळघाटे नोडल अधिकारी विभागीय अमलबजावणी कक्ष स्मार्ट नागपूर, बसवराज मास्तोळी प्रमुख ,जिल्हा अमलबजावणी कक्ष स्मार्ट गडचिरोली, श्री सर्वेश, रिझर्व बँक ऑफ इंडिया नागपूर रिजनचे व्यवस्थापक श्री सौरभ, जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्टच्या नोडल अधिकारी अर्चना कोचरे, श्री बलगमवार,श्री डेहनकर, तसेच उपविभागीय कृषी अधिकारी श्री परांजपे, तालुका कृषी अधिकारी श्री खंडारे, कृषी पर्यवेक्षक श्री देशमुख, कृषी सहाय्यक श्री तुळसकर, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री रहांगडाले, जिल्हा अमलबजावणी कक्ष स्मार्ट गडचिरोली चे अर्थशास्त्रज्ञ श्री शहारे तसेच सलाम किसान कंपनीचे प्रतिनिधी दोन पायलट यांचे प्रमूख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमात 70-80 शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button